सर्वाधिक वेगाने चार्ज होणारा लेनोवोचा ‘लीजन’


फोटो साभार टाईम्स २४ नौ
द. कोरियन कंपनी लेनोवोने लीजन नावाने नवा स्मार्टफोन बाजारात दाखल केला जात असल्याची घोषणा केली आहे. जगातील हा सर्वाधिक फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेला स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने केला असून या फोनला ९० डब्यूासचा फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला गेला आहे. फोनला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर आहे आणि हा फाईव्ह जी स्मार्टफोन आहे.

लिक रिपोर्टनुसार या फोनला ५०५० एमएएच बॅटरी दिली जाईल. तसेच हाय रिफ्रेश रेट डिस्प्लेसह या फोनला रिअर मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप, युएसबी टाईप सी पोर्ट असेल. सध्या बाजारात फास्ट सपोर्ट चार्जिंग सह उपलब्ध असलेल्या स्मार्टफोन मध्ये ओप्पोचा रेनो एस स्मार्टफोन सर्वाधिक फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेला फोन आहे. त्याला ६५ डब्ल्यू पॉवर सपोर्ट दिला गेला आहे. शाओमी आणि विवो अनुक्रमे १०० डब्ल्यू आणि १२० डब्ल्यू फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीसाथी टेस्टिंग करत असल्याचीही बातमी आहे.

Leave a Comment