नॅशनल स्टॉक एक्स्चेंजची पीएम केअर्स मध्ये २६ कोटींची देणगी


फोटो साभार फोर्च्यून इंडिया
देशात करोनाची सुरवात झाल्याबरोबर करोनाविरुध्दच्या लढाईसाठी २८ मार्च रोजी पीएम केअर्स फंडची घोषणा झाल्यापासून या फंडात मदतीचा ओघ सतत वाढता राहिला असून आता नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने पीएम केअर्स फंडासाठी २६ कोटी रुपये देत असल्याचे जाहीर केले आहे. शिवाय नॅशनल स्टॉक एक्स्चेंज मधील कर्मचारी त्यांचा एक दिवसाचा पगार या फंडासाठी देणार आहेत असेही जाहीर केले गेले आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने ही देणगी म्हणजे करोना विरुध्दच्या लढाईत सरकार बरोबरची प्रतिबद्धता व्यक्त करणे आहे असे म्हटले आहे.

पीएम केअर्स फंडाची घोषणा झाल्यापासून देशातील टाटा, अंबानी, प्रेमजी, महिंद्र, अडाणी, दमाणी या सारख्या अनेक उद्योजकांनी मदतीचा भरीव हात पुढे केला आहे त्याचबरोबर सेलेब्रिटी पासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वजण आपापल्या क्षमतेप्रमाणे मदत करत आहेत. कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी याना पत्र लिहून ही रक्कम पंतप्रधान मदतनिधी कोशात ट्रान्स्फर करावी असे सुचविले आहे. कॉंग्रेसच्या म्हणण्यानुसार पीएम केअर्स फंड ही उपलब्ध संसाधनाची बरबादी असून मोदींच्या राजकीय महत्वाकांक्षेचा परिणाम आहे.

Leave a Comment