डेमनच्या स्पेशल एडीशन इ- सुपरबाईक्स किंमत ३० लाख


फोटो साभार, नवभारत टाईम्स
कॅनडातील डेमन मोटरसायकल्सने हायपर स्पोर्ट्स प्रीमियर नावाने इलेक्ट्रिक सुपरबाईक्सची दोन व्हर्जन सादर केली आहेत. आर्क्टिकसन आणि मिडनाईटसन अश्या नावाच्या या इलेक्ट्रिक बाईक लिमिटेड एडिशन बाईक आहेत. सध्या बाजारात ज्या वेगवान इलेक्ट्रिक सुपरबाईक्स आहेत त्यात या बाईक्स सर्वाधिक वेगाने चार्ज होणाऱ्या आणि सर्वात अॅडव्हान्स्ड आहेत असा कंपनीचा दावा आहे. या सुपरबाईकचे बुकिंग सुरु झाले असून त्यांची किंमत ३९९९५ डॉलर्स म्हणजे ३० लाख ५० हजार रुपये आहे.

या दोन्ही बाईक फुल फेयर्ड बाईक्स आहेत आणि त्यांना अग्रेसिव्ह लुक दिला गेला आहे. रेकेड विंडस्क्रीन, कर्व्ही पॅनल, ब्लॅक मेकॅनिकल बिट्स, एलईडी लाईट्स, रेज्ड टेल लँप दिला गेला आहे. २० केडब्ल्यूएच बॅटरी पॅक, लिक्विड कुल इलेक्ट्रिक मोटर दिली गेली आहे आणि दोन्ही बाईक एका चार्ज मध्ये ३२२ किमी अंतर कापू शकतात. या बाईक्सचा सर्वाधिक वेग ताशी ३२२ किमीच आहे. तीन सेकंदापेक्षा कमी वेळात ० ते १०० किमीचा वेग पकडू शकतात आणि २० मिनिटात ८० टक्के चार्ज होतात. बाईक लेवल २ चार्जर च्या सहाय्याने तीन तासात पूर्ण चार्ज होतात.

या दोन्ही बाईक मध्ये रडार संचालित क्रॅश डिटेक्शन व व्हेईकल अॅव्हॉयडन्स वॉर्निंग सारखे अत्याधुनिक रायडर सेफ्टी सिस्टीम आणि अनेक अत्याधुनिक अन्य फिचर्स दिले गेले आहेत.

Leave a Comment