दिग्गज भारतीय उद्योगपतींकडे आहेत या शानदार कार्स

अभिनेता-अभिनेत्री, क्रिकेटर्सकडे अनेक शानदार कार्सचे कलेक्शन असल्याचे आपण अनेकदा ऐकत असतो. मात्र उद्योग क्षेत्रातील दिग्गज उद्योगपती देखील याबाबतीत कमी नाही. भारतातील दिग्गज उद्योगपतींकडे अनेक शानदार कार्स आहेत. तर काही उद्योगपती अगदी सर्वसामान्यांप्रमाणेच कार वापरतात. भारतातील अशाच दिग्गज उद्योगपती आणि त्यांच्याकडे असलेल्या कार्सविषयी जाणून घेऊया.

Image Credited – NDTV

रतन टाटा –

टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा हे कॉर्पोरेट जगतात एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळखले जाते. टाटा नॅनोची कल्पना देखील रतन टाटा यांचीच होती. टाटा यांच्या कलेक्शनमध्ये अनेक शानदार कार्स आहेत. यामध्ये फेरारी कॅलिफोर्निया, मर्सिडीज-बेंझ 500 एसएल, कॅडिलॅक एक्सएलआर, क्रिसलर सेब्रिंग, मर्सिडीज डब्ल्यू 124, मर्सिडीज-बेंझ एस-क्लास, टाटा इंडिगो मरिना आणि अलिकडेच टाटा नेक्सॉनचा देखील समावेश झाला आहे. याशिवाय त्यांच्याकडे होंडा सिव्हिक आणि लँड रोव्हर फ्रिलँडर देखील आहे.

Image Credited – NDTV

आनंद महिंद्रा –

महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा हे ट्विटवर अनेक मजेशीर गोष्टी शेअर करण्यासाठी ओळखले जातात. महिंद्रा आणि महिंद्रासचा मुख्य व्यवसाय कार उत्पादनच आहे. गेली अनेक वर्षात महिंद्रा यांच्या गॅरेजमध्ये महिंद्रा बोलेरो इनव्हॅडर, आर्मर बॉडी किटसोबत टीयूव्ही 300, टीयूव्ही 300 प्लस, स्कॉर्पिओ, एक्सयूव्ही 500 आणि अलीकडील महिंद्रा अल्ट्रस जी 4 चा समावेश आहे.

Image Credited – NDTV

मुकेश अंबानी –

मुकेश अंबानी हे कॉर्पोरेट जगतातील मुघल म्हणून ओळखले जातात. अंबानी यांच्याकडे जगतील सर्वात महागड्या गाड्या देखील आहेत. त्यांच्याकडे बेंटले बेन्तागा, बेंटले मुलस्ने, मर्सिडीज-एएमजी जी 63, मेबॅक 62, अनेक रेंज रोव्हर्स, रोल्स रॉयस फॅंटम ड्रॉपहेड कूपे, पोर्शे कायेन आणि बीएमडब्ल्यू आय 8 आहे. एकेकाळी त्यांच्याकडे एस्टॉन मार्टीन रॅपिड देखील होती.

याशिवाय त्यांनी काही दिवसांपुर्वीच टेस्ला मॉडेल्स एस, रोल्स रॉयस फॅंटम VIII ईडब्ल्यूबी, रोल्स रॉयस कॅलिनन एसयूव्ही, लॅम्बोर्गिनी उरुस आणि ऑडी आरएस 7 देखील खरेदी केली आहे. अंबानी यांच्या सुरक्षेसाठी असलेली सुरक्षा रक्षक बीएमडब्ल्यू एक्स5, लँड रोव्हर डिस्कव्हरी स्पोर्ट आणि फोर्ड फोर्ड एन्डेव्हर एसयूव्ही वापरतात.

Image Credited – NDTV

कुमार मंगलम बिर्ला –

आदित्य बिर्ली ग्रुपचे चेअरमन कुमार बिर्ला यांना गोष्टी साध्या आणि आरामदायी आवडतात. त्यांच्या कार कलेक्शनमध्ये बुलेट प्रूफ बीएमडब्ल्यू 760 एल, मर्सिडीज-मेबॅक एस 600, बीएमडब्ल्यू 5 सीरिज आहे. याशिवाय खाजगी जेटमध्ये त्यांच्याकडे गल्फ स्ट्रिम जी100 आणि सेस्ना सिटॅशन देखील आहे.

Image Credited – NDTV

एनआर नारायण मुर्ती –

इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मुर्ती यांच्या ताफ्यात महिंद्रा स्कॉर्पियो, स्कोडा लॉरा आणि सेकेंड जनरेशन स्कोडा ऑक्टिव्हाचा देखील समावेश आहे.

Image Credited – NDTV

नंदन नीलेकणी –

इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि नॉन एग्झिक्टिव्ह चेअरमन नंदन नीलेकणी हे आपले राहणीमान आणि गाड्यांसंदर्भात साध्या राहणीमानासाठी ओळखले जातात. त्यांच्या गॅरेजमध्ये टोयोटो इनोव्हा, टोयोटा कॅम्रीचा समावेश आहे.

Image Credited – NDTV

अझीम प्रेमजी –

विप्रोचे संस्थापक आणि अझीम यांची पहिली कार फोर्ड इस्कॉर्ड होती, जी त्यांनी 9 वर्ष वापरली. त्यानंतर त्यांनी टोयोटो कोरोल्ला खरेदी केली. याशिवाय त्यांनी आपल्याच कंपनीतील कर्मचाऱ्याकडून मर्सिडीज-बेंझ ई-क्लास (डब्ल्यू 211) खरेदी केली होती.

Image Credited – NDTV

सायरस पुनावाला –

पुनावाला कुटुंबाच औषध निर्मिती क्षेत्रात मोठे योगदान आहे. मात्र यासोबतच त्यांच्याकडे शानदार कार कलेक्शन आहे. पुनावाला कुटुंबाच्या गॅरेजमध्ये मर्सिडीज-एएमजी जीटी-आर रोडस्टर, रोल्स रॉयस फँटम VIII ईडब्ल्यूबी, रोल्स रॉयस फँटम ड्रॉपहेड कूप, फेरारी 458 स्पेशल अपेर्टा, लम्बोर्गिनी गॅलार्डो, मर्सिडीज-बेंझ एसएलएस एएमजी, बेंटली फ्लाइंग स्पर स्पीड सारख्या अनेक गाड्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त व्हिंटेज कारमध्ये 1956 मर्सिडीज बेंझ 190 एसएल, 1960-61 रोल्स रॉयस सिल्वर क्लाउड II, आणि 1949 बेंटली मार्क VI आहे. याशिवाय बॅटमॅन चित्रपटापासून प्रेरित असलेली बॅटमोबाईल कार देखील पुनावाला यांच्या ताफ्यात आहे.

Image Credited – NDTV

गौतम अदानी –

अदानी ग्रुपचे संस्थापक आणि चेअरमन यांच्याकडे फेरारी कॅलिफोर्निया, बीएमडब्ल्यू 7 सीरिज आणि रोल्स रॉयस घोस्ट सारख्या शानदार कार्स आहेत.

Leave a Comment