ही आहे जगातील सर्वात खतरनाक रायफल

रशियामध्ये एक अशी रायफल तयार करण्यात आली आहे जी 3.2 किमी लांब अंतरावरील शत्रूला देखील निशाणा बनवू शकते. याला जगातील सर्वात खतरनाक रायफल असल्याचे म्हटले जात आहे. या SVLK-14S रायफलची किंमत जवळपास 28 लाख 62 हजार रुपये असून, रायफलला लोबाइव्ह आर्म्स कंपनीने बनवले आहे.

या रायफलचे वजन 10 किलो आहे. ब्रिटनच्या सैन्याकडे असलेली सर्वोत्तम रायफल L115A3 द्वारे जेवढ्या लांब निशाणा साधत येतो. त्याच्या दुप्पट अंतरावर ही रायफल निशाणा साधू शकते.

Image Credited – Aajtak

या रायफलमधून एकावेळी एकच गोळी फायर होईल. कंपनीचे चीफ इंजिनिअर यूरी सिनिचकिन यांच्यानुसार, या रायफलला प्रोफेशनल स्नायपर आणि शानदार बंदूक गोळा करणाऱ्यांसाठी बनवण्यात आले आहे.

Image Credited – Aajtak

आवाजापेक्षा तीन पट अधिक वेगाने यातून गोळी फायर होते. बुलेट प्रुफ जॅकेट घातले असले तरी या रायफलद्वारे शत्रू वाचू शकत नाही. ब्रिटनच्या रॉयल पोलिसांच्या वेपन इंटेलिजेंस विभागात कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, जर या रायफलद्वारे खरचं 3 किमी अंतरावर निशाणा साधता येत असेल तर ही रायफल गेम चेंजर ठरू शकते.

Leave a Comment