मुंबई पोलिसांनी घेतली त्या ‘प्रोफेसर’ची मदत

मुंबई पोलीस नागरिकांना सजग करण्यासाठी अनेकदा हटके पद्धतीचा वापर करते. अनेकदा मुंबई पोलीस ट्विटरद्वारे मिम्स शेअर करत नागरिकांना गंभीर विषय अगदी मजेशीर पद्धतीने समजवतात. या गोष्टींसाठी मुंबई पोलिसांचे विशेष कौतूक देखील केले जाते.

आता पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी घरातच सुरक्षित राहावे यासाठी मुंबई पोलिसांनी ट्विटरवर मिम शेअर केले आहे. यामध्ये नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय सीरिज मनी हाइस्टमधील एका पात्राचा डायलॉग वापरण्यात आला आहे.

मिम शेअर करत मुंबई पोलिसांनी लिहिले की, प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही लॉकडाऊनमध्ये गँगसोबत विनाकारण बाहेर जाण्याचा प्रयत्न करता. पुढे फोटोवर लिहिले की, तुम्ही काय अक्कल गहाण ठेवली आहे का ?

या फोटोमध्ये मनी हाइस्ट सीरिजमधील मुख्य पात्र असलेल्या प्रोफेसरचा फोटो वापरला आहे.

युजर्सला मुंबई पोलिसांची ही हटके पद्धत खूपच आवडली असून, या ट्विटला आतापर्यंत 4 हजारांपेक्षा अधिक लाईक्स आले आहेत. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे.

Leave a Comment