सलाम ! नवजात बाळाला घेऊन आयएएस अधिकारी कामावर दाखल

सध्या भारतात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. या महामारीशी लढण्यासाठी डॉक्टरांसापासून ते प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत सर्वच जण दिवस-रात्र मेहनत करत आहेत. विशाखापट्टणमच्या महापालिका आयुक्त श्रीजना गुमल्ला यांनी आपल्या कार्यासमोर एक उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. श्रीजना यांना बाळाला जन्म दिल्यानंतर 3 महिन्यांनी आपल्या कामावर रूजू झाल्या आहेत. सध्या देश कोरोना व्हायरस संकटाचा सामना करत आहे, त्यामुळे याच कारणामुळे त्यांना कामावर लवकरच परतण्याची प्रेरणा मिळाली.

2013 च्या आयएएस बॅचच्या अधिकारी श्रीजना यांचा बाळाला ऑफिसमध्ये घेऊन बसल्याचा फोटो व्हायरल झाला आहे.

श्रीजना म्हणाल्या की, कोरोना व्हायरसच्या या कठीण परिस्थितीमध्ये मी मुख्यमंत्र्यांना कामावर परतण्याची परवानगी मागितली. त्यांनी मला परवानगी दिल्याने मी त्यांची आभारी आहे.

त्या म्हणाल्या की, काम माझ्यासाठी कर्तव्य आहे. माणूस म्हणून प्रशासनाला माझ्याकडून ही मदत आहे. मला असे वाटते की या कठीण परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी एकत्र येऊन एकमेकांना बळ दिले पाहिजे.

देशाकडे असे कोरोना योध्दा असणे, सौभाग्याची गोष्ट आहे. कर्तव्य प्रतिबद्धतेच्या या जिवंत उदाहरणाला मनापासून आभार, अशा शब्दात केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आयएएस अधिकाऱ्याचे कौतूक केले.

Leave a Comment