अगदी सोप्या पद्धतीने ड्रायव्हिंग लायसन्स-आधार असे करा लिंक

सरकारने आधार आणि पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. मात्र अद्याप ड्रायव्हिंग लायसन्स आणि आधार लिंक करणे सरकारने अनिवार्य केलेले नाही. मात्र भविष्यात सरकार असे पाऊल उचलू शकते. यामुळे बनावट लायसन्स देखील रोखता येतील. तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने आधार आणि ड्रायव्हिंग लायसन्स लिंक करू शकता.

Image Credited – Amarujala

यासाठी सर्वात प्रथम sarathi.parivahan.gov या वेबसाईटवर जा. येथे राज्य निवडल्यानंतर डाव्या बाजूला Apply Online वर क्लिक केल्यानंतर Services on Driving Licence (Renewal/Duplicate/Aedl/Others) असा पर्याय दिसेल.

Image Credited – Amarujala

यानंतर तुमच्यासमोर नवीन विंडो उघडेल. येथे पुन्हा राज्याची माहिती द्यावी लागेल. राज्याची माहिती दिल्यानंतर आधार कार्डसंबंधी माहिती द्या.

Image Credited – Amarujala

तुमच्या समोर ड्रायव्हिंग लायसन्सची संपुर्ण माहिती असेल. त्याच्या खालीच तुम्हाला मोबाईल नंबर आणि आधार कार्डचा पर्याय मिळेल. यानंतर आधार आणि मोबाईल नंबर टाकून ड्रायव्हिंग लायसन्स अपडेट करू शकता.

मात्र सरकारने अद्याप ड्रायव्हिंग लायसन्स आधारशी लिंक करणे अनिवार्य केलेले नाही. केल्यास तुम्ही या पद्धतीने लिंक करू शकता.

Leave a Comment