ऑनलाईन फसवणुकीपासून सावध करणार ‘सायबर दोस्त’

लॉकडाऊनमुळे लोक घरात कैद आहेत, यामुळे ऑनलाइन सक्रियता देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचाच फायदा आता सायबर गुन्हेगार घेताना दिसत आहेत. लोकांना सायबर व ऑनलाईन फसवणुकीपासून वाचवण्यासाठी गृहमंत्रालयाने ट्विटरवर सायबर दोस्त नावाने हँडल सुरू केले आहे.

या हँडलवरून सायबर सुरक्षा संबंधी अनेक सुचना देण्यात आल्या. राष्ट्रीय क्राइम रिपोर्टिंग पोर्टल cybercrime.gov.in  वर सायबर गुन्ह्यांसंबंधी माहिती दिली जात आहे. मंत्रालयाने लोकांना सायबर गुन्हे रिपोर्ट करण्यास सांगितले आहेत.

सायबर दोस्तद्वारे ऑनलाईन बँकिंग पासून ते हँकिंग अशा सायबर गुन्हे करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. याशिवाय ऑनलाईन व्यवहार, सायबर सुरक्षा, लहान मुलांसाठी इंटरनेटचा सुरक्षित वापर अशा सुचना देखील देईल.

सायबर दोस्त तक्रार करण्यासाठी कोणते उचित माध्यम आहे, याची माहिती देते. युजर्स ट्विटर हँडलच्या फीडवर प्रश्न विचारू शकतात. यासोबतच सामान्य अधिकारी आणि सरकारी अधिकाऱ्यांसाठी टिप्स शेअर केल्या जातील. हे हँडल लोकांमध्ये जागृकता पसरवण्याचे काम करेल.

Leave a Comment