आली रॉयल एनफिल्डची नवीन इलेक्ट्रिक बाईक

मागील काही महिन्यांमध्ये इलेक्ट्रिक गाड्या मोठ्या प्रमाणात लाँच झाल्या आहेत. आता यामध्ये रॉयल एनफिल्डचे देखील नाव जोडले गेले आहे. रॉयल एनफिल्डची इलेक्ट्रिक बाईक फोटॉनचा लूक समोर आला आहे. ही बाईक रॉयल एनफिल्ड क्लासिक 500 चे इलेक्ट्रिक व्हर्जन आहे. मात्र यात थोडेफार बदल करण्यात आले आहेत. या इलेक्ट्रिक बाईकची किंमत जवळपास 19 लाख रुपये असून, ही बाईक सर्वांसाठी उपलब्ध नाही.

Image Credited – Amarujala

रॉयल एनफील्ड फोटॉनमध्ये 10 kW इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली असून, याचा टॉप स्पीड ताशी 110 किमी आहे. याशिवाय या बाईकमध्ये क्लच, गिअर्स नाहीत. शिवाय रिअर व्हिल हब माउंटेड असल्याने बेल्ट आणि फायनल ड्राईव्ह देखील नाही. हब मोटर वॉटर-कुल्ड आहे.

यात चार 2.5 kWh लिथियम-आयन बॅटरी देण्यात आल्या असून, फुल चार्जमध्ये ही बाईक 125 ते 130 किमी चालते.

Image Credited – Amarujala

यासोबतच इलेक्ट्रिक फोटॉनमध्ये चार्जिंगसाठी 7kw चार्जर आणि टाइप 1 कनेक्टर मिळेल. ज्याद्वारे 90 मिनिटात फुल चार्जिंग होईल. याशिवाय फ्रेम, सस्पेंशन आणि जिओमेट्री इत्यादी गोष्टी क्लासिक 500 प्रमाणेच आहेत. मात्र नवीन इलेक्ट्रिक बाईकचे वजन क्लासिक 500 च्या तुलनेत अधिक आहे. रॉयल एनफिल्ड फोटॉनचे वजन जवळपास 200 किलो आहे.

Leave a Comment