लॉकडाऊन : ड्रोनने पान-मसाला पोहचवणे पडले महागात, दोघांना अटक

लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व सेवा बंद आहेत. अशा स्थिती नागरिकांना काही गोष्टी मिळणे बंद झाली आहे. काही दिवसांपुर्वी ड्रोनच्या मदतीने टॉयलेट पेपर आणि व्हिस्की पाठवल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होतो. मात्र आता गुजरातमध्ये ड्रोनच्या मदतीने चक्क पान मसाला पाठवल्याचा प्रकार समोर आला आहे.

गुजरातच्या मोरबी येथील एका व्यक्तीने चक्क ड्रोनच्या मदतीने पान-मसाला दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहचवला. सुरूवातीला हा व्हिडीओ टीक-टॉकवर शेअर करण्यात आला होता. त्यानंतर ट्विटर आणि इंस्टाग्रामवर या व्हिडीओ शेअर करण्यात आले.

View this post on Instagram

ગુજરાતીઓ પાન-મસાલા માટે કંઈપણ કરી શકે તે ફરી એકવાર સાબિત થઈ ગયું….કોરોનાની આ મહામારીના સમયમાં પણ મોરબીમાં ડ્રોનથી મસાલો લેવામાં આવ્યો.. પોલીસને જાણ થતાજ કારવાઈ કરવામાં આવી છે…. આવું જોખમ ના ખેડો🙏 Courtesy:- Social Media #morbi #lockdown2020 #lockdown #panmasala #gujaratpolice #ahmedabad #rajkot #surat #baroda #gujju #gujjuthings #gujjugram #gujju_vato #gujjustyle #gujjuworld #gujjuwood #gujjuness #gujjuchu #drone #dronephotography #dronestagram #tiktok #tiktokgujju

A post shared by પારકી પંચાત (@parki_panchat) on

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पान मसालाचे पाकिट ड्रोनला लावण्यात आलेले आहेत व एक व्यक्ती ते घेण्यासाठी छतावर वाट पाहत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी या संदर्भात दोघांना अटक केले आहे.

Leave a Comment