या राज्यात उघडी राहणार दारू दुकाने


फोटो साभार बिझिनेस इनसायडर
आसाम आणि मेघालय या राज्यानी सोमवार पासून म्हणजे १३ एप्रिल पासून राज्यातील दारूची दुकाने सुरु करण्याचा निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले आहे. आसाम मध्ये ही दुकाने सात दिवस उघडी राहणार आहेत तर मेघालय मध्ये शुक्रवार पर्यंत उघडी राहणार आहेत. या दुकानानातून सोशल डीस्टन्सिंगचे पालन करूनच दारू विक्री केली जाणार आहे. तसेच मेघालय मध्ये दुरच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना मद्याची होम डिलीव्हरी दिली जाणार आहे.

दरम्यान जम्मू मध्ये एका दारूच्या दुकानाची मागची भिंत फोडून चोरट्यांनी रोकड आणि दारूच्या बाटल्या चोरून नेल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली आहे. देशभरात करोना मुळे १५ एप्रिल पर्यंत लॉक डाऊन आहे आणि अनेक राज्यांनी स्वतःच्या अखात्यारीत लॉक डाऊनची मुदत ३० एप्रिल पर्यंत वाढविली आहे. देशभरात कोविड १९ ची लागण झालेल्यांची संख्या ८८८४ वर पोहोचली असल्याचे आणि २७३ मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगितले गेले आहे. रविवारी देशात नवीन ९१८ रुग्ण सापडले असून ३१ मृत्यू झाले आहेत. ७६५ रुग्ण बरे होऊन घरी पाठविले गेले आहेत.

Leave a Comment