२ हजार वर्षात १ लाखापेक्षा अधिक जीव घेणारी करोना १७ वी महामारी


कोविड १९ ने बळी घेतलेल्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि आत्तापर्यंत १ लाख १९ हजार बळी त्याने घेतले आहेत. मात्र गेल्या २ हजार वर्षांचा विचार केला तर १ लाखाहून अधिक बळी घेणारी कोविड १९ ही १७ वी जीवघेणी साथ आहे असे म्हणता येते. नॅशनल जिओग्राफिक आणि सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन यांच्या कडच्या आकडेवारी वरून हे स्पष्ट झाले आहे.

या आकडेवारीनुसार गेल्या दोन हजार वर्षांच्या काळात या प्रकारच्या भयानक २० साथी आल्या मात्र १ लाखहून अधिक जीव घेणाऱ्या साथी १६ होत्या आणि कोविड १९ ही १७ वी आहे. इतिहासातील नोंदी असे सांगतात, एन्टोनाईन प्लेगची सन १६५ मध्ये आलेली पहिली साथ आशिया, इजिप्त, ग्रीस, इटली मध्ये पसरली होती आणि त्यात ५० लाख मृत्यू झाले होते.


फोटो साभार द हिस्ट्री
अशी दुसरी साथ ५४१-४२ असली जार्स्टनिक प्लेगची साथ आली ती आशिया, उ. आफ्रिका, अरेबिया आणि युरोप मध्ये पसरली होती मात्र त्याचा सर्वाधिक प्रभाव रोमन साम्राज्य बैजेन्टाइन वर पडला होता आणि त्यात ५ कोटी बळी गेले होते. हा आकडा जगाच्या त्यावेळच्या लोकसंखेच्या ५० टक्के इतका होता. म्हणजे जगाची लोकसंख्या एक वर्षात निम्मी झाली होती. १३४७ टे १३५१ या काळात पुन्हा प्लेगचीच साथ आली त्याची नोंद ‘ द ब्लॅक डेथ’ नावाने केली गेली. युरोप, आशिया आणि चीन पर्यंत ही साथ गेली. त्यावेळी समुद्रमार्गे व्यापार होत असे. जहाजावरच्या उंदरांमुळे या साथीचा फैलाव झाला होता. यामुळे युरोप मध्ये इतके मृत्यू झाले की युरोपची लोकसंख्या परत मूळपदावर यायला २०० वर्षे जावी लागली.


१४९२ मध्ये युरोपियन अमेरिकेत गेले तेव्हा त्यांच्यासोबत देवी गोवर साथ तिकडे गेली. त्यात अमेरिकेच्या लोकसंख्येचा ३० टक्के म्हणजे सुमारे दोन कोटी नागरिक मरण पावले याचा फायदा युरोपियन लोकांना झाला कारण त्यामुळे त्यांना अमेरिकेत बरीच रिकामी जागा मिळविता आली. त्यांनी त्यांच्या वसाहती अमेरिकेत वसविल्या. गोवरामुळे जगात आत्तापर्यंत ५.५ कोटी मृत्यू झाले आहेत. कॉलरा ही अशीच आणखी एक साथ. १८१७ मध्ये या साथीचा उगम भारतातूनच झाला आणि दुषित पाण्यामुळे त्यावेळी १० लाख मृत्यू झाले. आजही दरवर्षी कॉलरा मुळे जगभरात १३ ते ४० लाख लोकांना याची लागण होते आणि त्यातील दीड लाख लोक मृत्युमुखी पडतात.

१९१८-१९ या काळात स्पॅनिश फ्ल्यूने असेच थैमान घातले होते. तो कुठून पसरला हे कळलेच नव्हते आणि त्याची लागण ५० कोटी लोकांना झाली होती त्यातील ५ कोटी मरण पावले होते. भारतात या साथीमध्ये १.७ कोटी जीव गेले होते. एच२एन२ विषाणू म्हणजे एशियन फ्ल्यू १९५७ साली पसरला हॉंगकॉंगमधून. त्यात ११ लाख, नंतर १९६८-७० या काळात आलेल्या एच३एन२ विषाणूने १० लाख तर २००९ साली आलेल्या स्वाईन फ्लूने साडेपाच लाख बळी घेतले होते.

याशिवाय १६२८ ते ३१ या काळात इटालियन प्लेगने १० लाख, १६६५ च्या ग्रेट प्लेग ऑफ इंग्लंडने १ लाख, यलो फिव्हरने १७९० पासून आजपर्यंत दीड लाख बळी घेतले आहेत. तर १८८९-९० मध्ये आलेल्या रशियन फ्ल्यूने १० लाख बळी घेतले आहेत.

Leave a Comment