वुहान मध्ये आता लग्ननोंदणीची साथ


फोटो साभार दै.भास्कर
कोविड १९ ची सर्वप्रथम लागण झालेल्या चीनच्या वुहान मध्ये आता लग्ननोंदणीची एकच लगीनघाई उडाली असल्याचे दिसून येत आहे. ७६ दिवसांच्या लॉक डाऊन मधून बाहेर पडलेल्या वुहानच्या विवाह सर्टिफिकेट कार्यालयाकडे दररोज किमान ४०० अर्ज विवाह नोंदणीसाठी येत आहेत मात्र करोनाचा धोका अजूनही न संपल्याने दररोज २० अर्जच मंजूर केले जात असल्याचे समजते. नोंदणी प्रमाणपत्र घेण्यासाठी येणाऱ्या जोडप्यांना सोशल डीस्टन्सिंगचे काटेखोर पालन करावे लागते आहेच पण मास्क घातल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही.

रजिस्ट्रेशन करू इच्छिणाऱ्या जोडप्याने दोन दिवस अगोदरच अलीपे किंवा व्ही चॅटच्या माध्यमातून अपॉइंट घ्यावी लागते आहे. रजिस्ट्रेशन कार्यालयातील अधिकारी सांगतात, परिस्थिती खुपच सुधारते आहे, लोक सरकारला पूर्ण सहकार्य करत आहेत आणि नागरिकांची एकजूट अभेद्य आहे. करोनाची लढाई आम्ही जिंकणार फक्त वेळेचा प्रश्न आहे.

करोनामुळे लॉकडाऊन करावे लागण्यापूर्वी या कार्यालयात एकाचवेळी अनेक जोडपी रांगा लावून उभी असायची. विशेषतः लुनर डे दिवशी खूप गर्दी होत असे. मात्र लॉक डाऊन नंतर हे कार्यालय बंदच केले गेले होते. आजही हे कार्यालय दररोज सॅनीटाईझ केले जाते. येणाऱ्या सर्वाना एक हिरवा क्यूआर कोड दिला जातो आणि शरीर तापमान चेक करूनच आत सोडले जाते.

Leave a Comment