ट्युलिप्स फुलले पण पर्यटकांविना सुने आहेत बगीचे


फोटो साभार काश्मीर टुरिझम
आशियातील सर्वात मोठे, श्रीनगर येथील इंदिरा गांधी मेमोरिअल ट्युलिप गार्डन आता ऐन बहरात आले आहे. ३० एकरात ५५ प्रकारची १३ लाखाहून जास्त ट्युलिप्स आता फुलली आहेत मात्र यंदा करोना मुळे देशात लॉक डाऊन असल्याने या ट्युलिपना पर्यटकांची उणीव जाणवते आहे. ऐन बहरातल्या या बागेत एकाही पर्यटक नाही. काश्मीर मध्येही लॉकडाऊन असून १६८ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे आणि तीन मृत्यू झाले आहेत.


हिमवर्षाव संपला आणि ट्युलिप व बदामवारी फुले फुलु लागली की जम्मू काश्मीर मध्ये वसंताचे आगमन झाले असे म्हटले जाते. या काळात लाखो पर्यटक काश्मीरला भेट देतात. काश्मीर मध्ये एकूण ३०८ बागबगीचे आहेत आणि ट्युलिप त्यातील एक महत्वाची बाग आहे. येथे देखभाली साठी १०० माळी तैनात असतात. दरवर्षी ‘बहार ए काश्मीर’ या नावाने १० दिवसांचा ट्युलिप फेस्टिव्हल येथे साजरा होतो. त्यावेळी पारंपारिक गाणी, कला कलाकार सादर करतात.

जगात नंबर एकचे ट्युलिप गार्डन हॉलंड येथे आहे. दोन नंबरवर अमेरिकेच्या माउंट वर्मोनचे उद्यान असून या यादीत तिसरा नंबर कॅनडाचा आणि चौथा ऑस्ट्रेलियाच्या तेस्लर ट्युलिप उद्यानाचा आहे. पाच नंबरवर काश्मीरचे ट्युलिप उद्यान आहे.

Leave a Comment