टीम इंडियाला मिळणार वॉल २


फोटो साभार झी न्यूज
टीम इंडियामध्ये आपल्या शैलीदार संयमित फलंदाजीने ‘ द वॉल ‘ अशी ओळख मिळविणाऱ्या राहुल द्रविड च्या पावलावर पाउल टाकून त्याचा मुलगा समित ज्या प्रकारे क्रिकेट मैदानावर पराक्रम करतो आहे ते पाहून टीम इंडियाला भविष्यकाळात ‘ वॉल २’ मिळणार असा विश्वास क्रिकेट जाणकार व्यक्त करू लागले आहेत.

समितच्या अंगात क्रिकेटचा वारसा वडिलांकडून भिनला आहे आणि त्याला उत्तम परिश्रमांची साथ त्याच्याकडून दिली जात आहे. गेले काही महिने समित सातत्याने केवळ फलंदाजीतच नाही तर गोलंदाजीत सुद्धा चांगली कामगिरी करत आहे. १४ वर्षाच्या या खेळाडूने दीर्घ डाव खेळण्याचे प्रात्यक्षिक अनेकदा घडविले आहे. ज्युनियर लेव्हलवर त्याने धमाल चालविली असून गेल्या काही दिवसात दोन डबल सेन्चुरी आणि गोलंदाजीत ३ विकेट घेऊन शालेय स्पर्धेत शाळेला विजेतेपद मिळवून दिले आहे.

समित मधला स्पार्क प्रथम झळकला तो २०१५ मध्ये जेव्हा त्याने मंगलोर अंडर १२ मध्ये शाळेसाठी तीन अर्धशतके झळकाविली तेव्हा. तेव्हापासून तो सातत्याने चांगली कामगिरी करत असून या खेळात वडिलांचा आदर्श दाखवून देत आहे. राहुल द्रविडच्या १६ वर्षाच्या क्रीडा करियर मध्ये त्याने १३२८८ टेस्ट रन्स तर वन डे मध्ये १०८८९ धावा काढल्या आहेत. इतकेच नाही तर टेस्ट क्रिकेट मध्ये ३० हजाराहून अधिक चेंडू खेळणारा तो एकमेव फलंदाज असून त्याचे हे वर्ल्ड रेकॉर्ड आजही कायम आहे.

Leave a Comment