लॉकडाऊन : युजर्सला मोफत पाहता येणार युट्यूबवरील हे प्रिमियम शोज

लॉकडाऊनमुळे नागरिक घरात असल्याने इंटरनेटचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. सोशल मीडियापासून ते स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मचा आनंद युजर्स घेत आहे. लॉकडाऊनमुळे आता युट्यूबने देखील आपल्या युजर्ससाठी प्रिमियम कंटेट मोफत उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे.

आता युजर्स युट्यूबचे इस्केप द नाईट (Escape the Night) आणि मॅटपॅट्स गेम लॅब (Matpat’s Game Lab) सारखे लोकप्रिय शो मोफत पाहू शकतील.

याआधी युट्यूबवरील प्रिमियम कंटेंट पाहण्यासाठी युजर्सला महिन्याला 129 रुपये भरवा लागत असे. मात्र आता युजर्सला इस्केप द नाईट, मॅटपॅट्स गेम लॅब, स्टेप अप – हाय वॉटर, इमप्लस, शेरवूड, साईट्सविप्ड, द साईडमन शो, फोरसम, मी अँड माय ग्रँडमा, एफ2 फायंडिंग फुटबॉल, द फेक शो आणि ओव्हरथिंकिंग विथ कॅट आणि जून हे शोज मोफत पाहता येतील.

याआधी व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइमने देखील लहान मुलांसाठी 50 पेक्षा अधिक टिव्ही शो, चित्रपट आणि नर्सरी राइम मोफत उपलब्ध केले आहे.

Leave a Comment