पोलीस संरक्षणात भाजप आमदाराच्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन

सध्या देशभरात कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मात्र या कशाचीही पर्वा न करता कर्नाटकच्या टुमकूर जिल्ह्यातील तुरूवेकेरचे भाजप आमदार एम जयराम यांनी धुमधडाक्यात आपला वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाला मोठ्या संख्येने त्यांचे समर्थक सहभागी झाले होते.

आमदारांनी सर्वांसोबत केक तर कापलाच, सोबत सर्वांना बिर्याणी देखील खायला घातली.

लॉकडाऊनच्या काळात अशा पद्धतीने वाढदिवस साजरा केल्याने या आमदारांवर आता अभिनेत्री रवीना टंडनने ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. रवीना टंडनने ट्विट केले की, अप्रतिम, महाराज की जय हो. सोबतच कोव्हिड इडियट्स असा हॅशटॅग देखील वापरला.

रवीनाच्या या ट्विटवर नेटकरी देखील रिएक्ट होत असून, वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Leave a Comment