लॉकडाऊन : प्रियकराशी लग्न करण्यासाठी तरूणीचा 60 किमी पायी प्रवास

सरकारने कोरोना व्हायरस महामारीचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषीत केला आहे. मात्र याकाळात लग्न करणाऱ्यांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत असून, लग्नाची तारीख पुढे ढकलावी लागत आहे. मात्र या सर्वात आंध्र प्रदेशमधील एक विचित्र घटना समोर आली येथे. येथील एका मुलीने आपल्या प्रियकराशी लग्न करण्यासाठी तब्बल 60 किमी पायी प्रवास केला आहे.

19 वर्षीय चितिकाला भवानी क्रिष्णा जिल्ह्यातील हनुमान जंक्शन येथे राहते. लॉकडाऊनमुळे सर्व सेवा बंद असल्याने चितिकालाने 60 किमी पायी प्रवास करत प्रियकर साई पुन्नयाच्या इडेपल्ली गावी पोहचली.

भवानी आणि पुन्नया हे दोघेही मागील 4 वर्षांपासून एकमेंकावर प्रेम करतात. आपल्या घराच्यांना देखील त्यांनी या नात्याबद्दल सांगितले. मात्र त्यांनी यास नकार दिला. पालकांनी लग्नास नकार दिल्याने दोघांनी पळून जाण्याचा देखील निर्णय घेतला होता. मात्र तेवढ्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली.

अखेर 60 किमी पायी चालत प्रियकराच्या गावी पोहचल्यानंतर दोघांनी लग्न केले. मात्र लग्नानंतर या नवविवाहित जोडप्याला भवानीच्या घरच्यांनी धमकवण्यास सुरूवात केली. या भितीने दोघांनीही सुरक्षेसाठी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. दोघेही प्रौढ असल्याने, पोलिसांनी मुलीच्या कुटुंबियाला काउंसेलिंगसाठी बोलवले.

भवानी म्हणाली की, लॉकडाऊन संपल्यानंतर आम्ही लग्न करणार होतो. मात्र सध्याच्या परिस्थितीत तसे दिसून येत नाही. लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. आम्ही थांबू शकत नव्हतो. त्यामुळे मी पायीच जाण्याचा निर्णय घेतला.

Leave a Comment