लॉकडाऊन : 4 वर्षीय मुलीला औषधे देण्यासाठी या व्यक्तीने केला दुचाकीने 150 किमी प्रवास

सध्या लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा सोडून सर्वकाही बंद आहे. लोकांना वेळेवर योग्य त्या सुविधा मिळाव्यात यासाठी देखील प्रयत्न केला जात आहे.  केरळच्या एका वैद्यकीय सर्जेंटने 4 वर्षीय कॅन्सर रुग्णापर्यंत औषधे पोहचवण्यासाठी 150 किमीचे अंतर दुचाकीने पार केल्याची घटना समोर आली आहे.

4 वर्षीय मुलगी केरळच्या अलाप्पुझा येथे राहते. दर महिन्याला किमोथेअरपीसाठी तिरुवनंतपुरम येथील स्थानिक कॅन्सर सेंटर येथे येत असते. मात्र लॉकडाऊनमुळे किमो यूनिट बंद असल्याने डॉक्टरांनी तिला काही दिवसांसाठी औषधे घेण्याचा सल्ला दिला.

मात्र तिच्या जिल्ह्यात औषधे न मिळाल्याने पालकांनी सिव्हिल पोलीस अधिकारी एंटोनी राथिश यांच्याकडे धाव घेतली. राथिश यांनी आपला मित्र विष्णूला तिरुवंतपुरम येथून औषधे आणण्यासाठी संपर्क केला. विष्णू हे माजी पोलीस अधिकारी आहेत, जे सध्या सर्जेंट म्हणून तिरुवंतपुरम मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत आहेत.

राथिश यांनी सांगितले की, विष्णू अलाप्पुझा येथून तिरूवनंतपुरम येथे कामासाठी जाणारच होते. तो तेथे एक आठवडे थांबणार होते. मात्र परिस्थिती सांगितल्यावर मदत करण्यास तयार झाले.

त्यानंतर विष्णू यांनी औषधांची चिट्टी घेत 29 मार्चला तेथून निघून गेले. मात्र औषधांची चिट्टी जुनी होती. मात्र डॉक्टरांना रुग्ण माहित असल्याने त्यांनी औषधे दिली. आणखी एक आव्हान समोर होते ते म्हणजे मुलीला सायंकाळी 6 पर्यंत औषधांची गरज होती. विष्णू यांनी कोल्लमपर्यंत औषधे पाठवण्याचा प्रयत्न केले, मात्र ते जमले नाही. अखेर त्यांनी स्वतः पुन्हा औषधे पोहचवण्यासाठी अलाप्पुझा येथे जाण्याचा निर्णय घेतला.

राथिश यांनी सांगितले की, विष्णूने सायंकाळी 5 वाजेपर्यंत औषधे पोहचवली. एवढ्या कमी वेळेत 150 किमी अंतर दुचाकीने पार करणे धोकादायक होते. विष्णूने या कामासाठी कोणतेही पैसे घेतले नाहीत.

राथिश यांनी सांगितले की, मुलीचे कुटुंब गरीब आहे आणि उपचाराचा खर्च पुर्ण करण्यासाठी संघर्ष करत आहेत. आशा आहे की कोणीतरी पुढे येऊन त्यांची मदत करेल.

Leave a Comment