लॉकडाऊन : एअरलाईन्सनी एकमेंकाशी साधलेल्या भन्नाट संवादाने जिंकले नेटकऱ्यांचे मन

सध्या लॉकडाऊनमुळे देशातील सर्व विमान सेवा बंद आहेत. त्यामुळे कोणत्याही एअरलाईन्सचे विमान उड्डाण घेत नाही. मात्र या एअरलाईन्स ट्विटरच्या माध्यमातून एकामेकांची थट्टामस्करी करत आहेत. सोबतच या कठीण परिस्थितीमध्ये घरातच राहणे उत्तम असल्याचा संदेश देत आहेत. लॉकडाऊनच्या स्थितीत या एअरलाईन्सनी ट्विटरवर एकमेकांशी साधलेला संवाद सध्या लोकांचे मन जिंकत आहे.

देशातील सर्वात मोठी खाजगी एअरलाईन्स इंडिगोने सर्वात प्रथम एअर विस्ताराला टॅग करत ट्विट केले की, हेय एअर विस्तारा, असे ऐकले की सध्या उंच उड्डाण घेत नाही ? सोबतच पार्किंगमध्येच सुरक्षित राहण्याचा देखील सल्ला दिला.

इंडिगोच्या या ट्विटनंतर सर्वच एअरलाईन्स या संवादामध्ये उतरल्या. इंडिगोला उत्तर देत एअर विस्ताराने ट्विट केले की, नाही इंडिगो, सध्या जमिनीवर राहणेच चांगले आहे. उड्डाण घेणे नक्कीच चांगला पर्याय नाही. काय गो एअरलाईन ?

गो एअरलाईनने देखील याला होकार देत लिहिले की, नक्कीच, एअरविस्तारा. घरी राहणे हेच सुरक्षित आहे. जोपर्यंत लोक विमान प्रवास सुरू करत नाहीत, तोपर्यंत आपण वाट पाहू शकतो. कारण सध्या लोक उड्डाण घेऊ शकत नाही, बरोबर ना एअरएशिया इंडिया ?

यावर उत्तर देताने एअरएशिया इंडियाने लिहिले की, नक्कीच. सध्या घरी राहणेच सर्वात योग्य आणि चांगली गोष्ट आहे. सोबत फ्लाय स्पाइस जेटला देखील टॅग केले.

स्पाइसजेटने उत्तर दिले की, एअर एशिया, हे समजल्यावर चांगले वाटले की, आपले विचार आपल्या रंगांप्रमाणेच जुळतात. पक्षी पिंजऱ्यातून उडलेले खूप दिवस झाले. मात्र चांगल्या भविष्यासाठी आपण सर्व आनंदी आहोत. बरोबर ना दिल्ली एअरपोर्ट ?

यावर दिल्ली विमानतळाने देखील त्यांच्या म्हण्याला होकार दिला.

यानंतर इंडिगोने संवाद संपवत लिहिले की, तुम्ही आमच्यासोबत आहात, हेच आम्हाला मजबूत बनवते.

लॉकडाऊनच्या काळातील सर्व एअरलाईन्सचा ट्विटर संवाद नेटकऱ्यांना देखील भलताच आवडला.

Leave a Comment