कोरोना : खोटी माहिती पसरवणाऱ्या भारतीय व्यक्तीविरोधात फेसबुकने दाखल केला खटला

कोरोना व्हायरस संदर्भातील सोशल मीडियावरील खोटी माहिती रोखण्यासाठी सरकार वारंवार लोकांना आवाहन करत आहेत. फेक न्यूज रोखण्यासाठी व्हॉट्सअपने मेसेज फॉरवर्डिंग आता एका व्यक्तीपर्यंतच मर्यादित केले आहे. आता फेसबुकने कोरोना व्हायरस संदर्भातील खोटी माहिती आणि फसवणूक करणारी जाहिरात शेअर केल्यामुळे सॉफ्टवेअर कंपनी चालणाऱ्या एका भारतीय व्यक्ती विरोधात कॅलिफोर्नियाच्या न्यायालयात खटला दाखल केला आहे.

कंपनीच्या जाहिरात समीक्षा प्रक्रियेत माहिती भ्रामक आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. फेसबुकचा आरोप आहे की बसंत गज्जर नावाच्या व्यक्तीची कंपनी लीडक्लोकने कोरोना व्हायरस, क्रिप्टोकरेंसी, वजन कमी करण्यासंदर्भातील खोटी माहिती आणि जाहिरातींसाठी एड-क्लोकिंग सॉफ्टवेअरचा वापर केला. यामुळे युजर्सला भ्रामक जाहिराती पाहण्यास मिळाल्या.

एड-क्लोकिंग सॉफ्टवेअर ऑनलाईन कंपन्यांच्या सर्च इंजिनला धोका देण्यासाठी बनवले जातात. याचा वापर केल्याने युजर्सला विचारलेल्या माहिती ऐवजी खोटी माहिती मिळते.

फेसबुकच्या कायदा विभागाचे संचालक जेसिका रोमेरो म्हणाले की, थायलंड येथील गज्जर यांच्या कंपनीने जाहिरात नियमांचे उल्लंघन केले आहे. लीडक्लोकचे शिकार गुगल, ओथ, वर्डप्रेस, शॉपिफाय आणि अन्य कंपन्या देखील झाल्या आहेत.

Leave a Comment