फेसबुकचे सोशल मीडिया व्यसनमुक्तिसाठी खास फीचर

सोशल मीडिया कंपनी फेसबुकने आपल्या आयओएस युजर्ससाठी Quiet Mode फीचर लाँच केले आहे. या नवीन फीचरमुळे युजर्स अ‍ॅपमध्ये येणारे नॉटिफिकेशन म्यूट करू शकतात. अँड्राईड युजर्ससाठी हे फीचर पुढील महिन्यात लाँच करण्याची शक्यता आहे.

कंपनीचे म्हणणे आहे की या टूलद्वारे युजर्सचे सोशल मीडियाचे व्यसन सोडवणार आहे व या प्लॅटफॉर्मवर घालवण्यात येणारा वेळ देखील कमी करणार आहोत.

युजर्सला मेसेज आणि नॉटिफिकेशनला काही वेळासाठी बंद करण्यासाठी या मोडमध्ये वेळ सेट करावी लागेल. यानंतर हे फीचर सुरू होईल व निश्चित वेळेत तुम्हाला नॉटिफिकेशन येणार नाहीत. याशिवाय फेसबुकवर किती वेळ घालवला, हे देखील युजर्स पाहू शकतील.

फेसबुकच्या आरोग्य विभागाचे अधिकारी कांग जिन यांच्यानुसार, युजर्स या नवीन मोडमुळे सोशल मीडियाच्या व्यसन पासून सुटका मिळवतील. यात युजर्सला मॅन्युअली नॉटिफिकेशन बंद करण्याची सुविधा मिळेल.

Leave a Comment