या ठिकाणी जिंवत राहण्यासाठी 24 तास घालावा लागतो मास्क

जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी नागरिकांना मास्क घालण्याचे आवाहन केले जात आहे. जगभरातील लोक या व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क घालत आहेत. मात्र जगात असे एक ठिकाण आहे जेथे आधीपासूनच जिंवत राहण्यासाठी 24 तास मास्क वापरावा लागतो.

जपानच्या मियाकेजीमा इजू बेटावर अनेक वर्षांपासून लोक 24 तास मास्क वापरतात. हा सर्वसाधारण मास्क नाही तर गॅस मास्क असतो. या बेटावरील परिस्थिती बिकट आहे. येथील हवे विषारी गॅसचे प्रमाण सामान्य स्तरापेक्षा अधिक आहे, त्यामुळे येथे राहणाऱ्यांना मास्क घालावा लागतो.

इजू बेट हे अनेक छोट्या-मोठ्या बेटांचा समूह आहे. येथील केवळ 7 बेट राहण्यायोग्य आहेत. त्यातील एक मियाकेजीमा हे बेट आहे. हे ठिकाण पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे, मात्र येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला मास्क दिला जातो. हे बेट एका ज्वालामुखी जवळ असल्याने, ज्वालामुखीचा स्फोट होण्याची भिती नागरिकांमध्ये सतत असते.

या बेटावर 2000 साली मोठा स्फोट झाला होता. हा स्फोट एवढा मोठा होता की, लोकांना घर सोडावे लागले होते. विषारी गॅसने हवेवर ताबा मिळवला. या भागात उड्डाण घेण्यास देखील बंदी होती.

जेव्हा स्फोट झाला तेव्हा लावासह मोठ्या प्रमाणात विषारी वायू (मुख्यतः सल्फर डायऑक्साइड) बाहेर आला. वर्ष 2000 आधी देखील येथे अनेक मोठे स्फोट झाले आहेत. मियाकेजीमा येथील ज्वालामुखीचा मागील 500 वर्षात अनेकवेळा स्फोट झाला आहे. 1940, 1962 आणि 1983 मध्ये येथे स्फोट झाला होता.

2000 साली स्फोट झाल्यानंतर येथे राहण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र 2005 नंतर हळूहळू लोकांनी येथे पुन्हा राहण्यास सुरूवात केली. सरकारने येथील लोकांना 24 तास मास्क लावण्यास सांगितले आहे. जे मास्क घालणार नाहीत, त्यांना बेटावर राहण्याची परवानगी नाही.

वर्ष 2000 मध्ये स्फोटानंतर 3600 लोकांनी हे बेट सोडले होते. येथील विषारी हवेने अनेकांची फुफ्फुस खराब केली आहेत. येथे लग्नात देखील लोक मास्क घालतात. गॅस मास्क पर्यटन येथील उत्पादनाचा मुख्य स्त्रोत आहे.

येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला मास्क दिला जातो. पर्यटन जगतात हे गॅस मास्क टूरिझम म्हणून प्रसिद्ध आहेत.

 

Leave a Comment