लॉकडाऊन : पोलीस कर्मचाऱ्यांच्या या कृत्यासाठी लोक करत आहेत सलाम

लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक प्रशसनीय काम जर कोणी केले असेल तर ते पोलीस आणि आरोग्य कर्मचारी आहेत. पोलीस या कठीण परिस्थिती लोकांची मदत करत आहेत. गरीबांना जेवण देण्यापासून त्यांच्यापर्यंत औषध देखील पोहचवत आहेत. सोशल मीडिया पोलीस कर्मचाऱ्यांचे दोन व्हिडीओ व्हायरल होत आहेत, हे व्हिडीओ पाहून तुम्ही त्यांना सलाम कराल.

गीतकार मनोज मुंतशिर यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला पोलीस कर्मचारी स्वतःच्या हाताने रस्त्यावर बसलेल्या एका महिलेला खायला घालत आहेत. ज्या महिलेला पोलीस कर्मचाऱ्याने खायला घातले, त्या विकलांग असल्याचे सांगितले जात आहे.

आतापर्यंत 3 लाखांपेक्षा अधिक जणांनी हा व्हिडीओ पाहिला असून, नेटकरी या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या कामाचे कौतूक करत आहेत.

हा दुसरा व्हिडीओ केरळचा असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की तीन पोलीस कर्मचारी रस्त्यावर बसलेल्या एका व्यक्तीला जेवण देण्यासाठी जातात. मात्र रस्त्यावर बसलेला व्यक्ती देखील समजदारी दाखवत पोलीस कर्मचाऱ्यांना लांबच जेवण ठेवायला सांगतो. जेणेकरून सोशल डिस्टेंसिंगचे पालन होईल.

नेटकरी हे दोन्ही व्हिडीओ पाहिल्यानंतर या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार्याला सलाम करत आहेत.

Leave a Comment