व्हाईट हाउस कडून फॉलो केले जाणारे मोदी एकमेव नेते


फोटो साभार झी न्यूज
महासत्ता अमेरिकेच्या व्हाईट हाउस कडून जगातील फक्त १९ ट्विटर हँडल फॉलो केली जातात आणि त्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश झाला आहे. व्हाईट हाउस कडून पर्सनल ट्विटर हँडल फॉलो केले जाणारे मोदी एकमेव विदेशी नेते बनले आहेत.

दोन दिवसांपूर्वी अमेरिकेने करोना विषाणूविरुद्ध लढाईत उपयुक्त ठरत असलेल्या मलेरिया विरोधी औषधांची मागणी मोदी यांच्याकडे केली होती. भारताने या औषधाच्या निर्यातीवर बंदी घातली होती मात्र अमेरिकेची मागणी आणि जगातील अन्य काही देशांकडून या औषधाला आलेली मागणी आणि करोना संसर्गाची गंभीरता लक्षात घेऊन ही बंदी उडविली गेली आणि औषधे अमेरिका तसेच अन्य देशात निर्यात केली गेली.


त्यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी मोदींना धन्यवाद दिलेच पण व्हाईट हाउसने मोदींचे वैयक्तिक ट्विटर हँडल फॉलो करायला सुरवात केली. व्हाईट हाउस जी १९ ट्विटर हँडल फॉलो करते त्यात एकही विदेशी नेता नाही. भारतातर्फे फक्त पीएओ आणि राष्ट्रपती ट्विटर हँडल व्हाईट हाउस कडून फॉलो केले जाते. त्यात आता मोदींचे तिसरे नाव जोडले गेले आहे.

Leave a Comment