जगात फैलावलेले करोना विषाणू तीन प्रकारचे


फोटो साभार जागरण
लाखाहून अधिक जीवांचा बळी घेणारा करोनाचा विषाणू तीन प्रकारचा असल्याचे नव्या संशोधनात दिसून आले आहे. अमेरिकेच्या सिनाई हॉस्पिटलच्या जीनोम वर आधारित केम्ब्रिज विद्यापीठातील वैज्ञानिकांनी हे संशोधन केले असल्याचे डेली मेल ने म्हटले आहे. त्यानुसार या करोना विषाणूंचे ए, बी आणि सी अश्या कॅटेगरी मध्ये विभाजन केले गेले आहे.

एका दिवसात करोनाचे सर्वाधिक बळी नोंदल्या गेलेल्या अमेरिकेच्या न्युयॉर्क मध्ये जो कोविड १९ विषाणू आढळतो आहे तो युरोपातून आला असून अमेरिकेच्या दुसऱ्या भागात आलेला विषाणू पश्चिम चीन मधून आला आहे.

वैद्यानिकांच्या संशोधनानुसार जो विषाणू वटवाघुळ आणि खवल्या मांजर यांच्यामधून प्रथम वेट मार्केट मध्ये आणि नंतर वुहान मध्ये पसरला त्याला टाईप ए असे नाव दिले गेले आहे. हा विषाणू चीन मध्ये जास्त पसरला नाही तर तो चीन मधून जपान, ऑस्ट्रेलियात पसरला आणि अमेरिकेच्या अनेक राज्यात गेला. टाईप बी हे टाईप ए च्या विषाणूचे बदललेले स्वरूप आहे. चीन मध्ये जे बळी गेले त्यात या विषाणूमुळे अधिक बळी गेले आहेत. टाईप बी युरोप, द. अमेरिका आणि कॅनडा मध्ये अधिक प्रमाणात होता तर टाईप सी सिंगापूर, इटली, हॉंगकॉंग मध्ये अधिक प्रभावित होता असे या संशोधकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे टाईप ए चा प्रसार डिसेंबर मध्ये नाताळच्या वेळेसच झाला असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Leave a Comment