ही अनोखी पाल अंडी देते आणि पिलांना जन्मही


फोटो साभार सिडने युनिव्हर्सिटी
सिडनी विश्वविद्यालयातील संशोधकांनी एका अनोख्या जातीच्या पालीचा शोध लावला असून ही पाल अंडी देतेच पण गरजेनुसार पिलांना जन्मही देते. या पालीला तीन टोज असून ती सापासारखी दिसते. पालीची ही वेगळीच जात आहे कारण ती दोन प्रकारे प्रजनन करू शकते.

सिडनी विश्वविद्यालयातील वैज्ञानिकांनी शोधलेल्या या पालीला सायफॉस इक्वालीस असे नाव आहे. वैज्ञानिक कॅमिला व्हीटिंगटन या संदर्भात माहिती देताना म्हणाल्या, या पालीचे निरीक्षण करताना असे दिसून आले, काही वेळा या पाली वातावरण असेल त्यानुसार कधी अंडी घालतात तर कधी पिलांना जन्म देतात. त्यांना हवामानानुसार स्वतःचा जीव वाचविण्यासाठी असे करणे अधिक फायद्याचे ठरते. विशेषतः थंड हवामानात त्या पिलांना जन्म देतात तर उष्ण हवामान असेल तर अंडी घालतात.

Leave a Comment