व्होडाफोन-आयडियाची खास ऑफर, प्रत्येक रिचार्जवर परत मिळणार पैसे

व्होडाफोन-आयडियाने आपल्या ग्राहकांना रिचार्जद्वारे कमाई करण्याची शानदार संधी दिली आहे. कंपनीचे ग्राहक आता रिचार्जवर 6 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळवू शकतात.

व्होडाफोन-आयडियाने रिचार्ज फॉर गुड नावाने एका नवीन प्रोग्रामची सुरूवात केली आहे. या प्रोग्रामचा उद्देश लॉकडाऊनच्या काळात जास्तीत जास्त ग्राहकांना रिचार्जची सुविधा मिळावी हा आहे. या ऑफरची सुरूवात 9 एप्रिलपासून झाली असून, 30 एप्रिलपर्यंत युजर्स याचा फायदा घेऊ शकतात.

या प्रोग्राम अंतर्गत कंपनीचे युजर्स मित्र, कुटुंबातील सदस्य अथवा कंपनीच्या अन्य ग्राहकाच्या क्रमांकावर रिचार्ज करून कॅशबॅक मिळवू शकतात. लॉकडाऊनमुळे असंख्य ग्राहक रिचार्ज करू शकत नाही. त्यामुळे ही स्थिती लक्षात घेऊन कंपनीने खास सुविधा सुरू केली आहे.

या कॅशबॅकचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला माय व्होडाफोन अथवा माय आयडिया अ‍ॅपवर लॉगइन करावे लागेल. यानंतर तुम्ही कंपनीच्या कोणत्याही ग्राहकाचे रिचार्ज केल्यास तुम्हाला 6 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळेल. या कॅशबॅकचा वापर पुढील रिचार्जसाठी करता येईल.

व्होडाफोन-आयडियाच्या आधी एअरटेल आणि रिलायन्स जिओने देखील आपल्या ग्राहकांसाठी अशीच एक खास ऑफर आणली आहे.

Leave a Comment