लॉकडाऊन : मुलाच्या घरवापसीसाठी आईचा स्कूटीवरून 1400 किमी प्रवास

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय सरकारने घेतला आहे. अत्यावश्यक सुविधा सोडून सर्व देखील या काळात बंद आहेत यामुळे अनेक कर्मचारी शेकडो किमी चालत आपल्या घरी जात आहे. अशातच तेलंगानामधील एका महिलेने लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या आपल्या मुलाला घरी परत आणण्यासाठी तब्बल 1400 किमीचा प्रवास स्कूटीने केला आहे.

तेलंगानाच्या निझामाबाद येथील 50 वर्षीय महिला शिक्षिका रझिया बेगम यांनी मुलाला घरी परत आणण्यासाठी आंध्र प्रदेशमधील नेल्लोरपर्यंत चक्क स्कूटीने प्रवास केला. नेल्लोर येथून लॉकडाऊनमुळे अडकलेल्या आपल्या 17 वर्षीय मुलाला घेऊन त्या पुन्हा घरी आल्या. या काळात त्यांनी स्कूटीवरून 1400 किमीचा प्रवास केला. यासाठी त्यांना 3 दिवस लागले.

रझिया या महाराष्ट्र-तेलंगाना सीमेवरील बोधान येथे शिक्षिका आहेत. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. त्यांचा मुलगा निझामुद्दीने मित्राचे वडील आजारी असल्याने नेल्लोरला गेला होता.

ही सर्व माहिती बोधानचे एसीपी जयपाल रेड्डी सांगितल्यावर त्यांनी कर्फ्यू पास दिला. त्यांच्या या प्रवासात तेलंगाना आणि आंध्र प्रदेशच्या पोलिसांनी देखील मदत केली.

Leave a Comment