लॉकडाऊनमध्ये सायबर गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ

देशाच्या सायबर सुरक्षा एजेंसीने मोबाईल फोनवर इंटरनेटचा प्रयोग करणाऱ्या सर्व लोकांना स्पायवेअर आणि रॅनसमवेअरपासून सावध राहण्यास सांगितले आहे. लॉकडाऊनमुळे मोबाईल फोनवर इंटरनेटचा वापर आणि त्यासोबतच सायबर फसवणुकीसह अन्य गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे.

कॉम्प्युटर इमर्जेन्सी रिस्पाँस टीम ऑफ इंडियाने (सीईआरटी-इन) खाजगी स्मार्टफोनला सुरक्षित ठेवण्यासाठी काही विशेष सुचना देखील दिल्या आहेत.

एजेंसीने म्हटले आहे की, या महामारीमुळे लोकांचे सर्वसामान्यपणे काम करण्याची पद्धत बदलली आहे. ते ऑफिस जाण्याऐवजी घरूनच काम करत आहेत. सायबर गुन्हेगार कोव्हिड-19 महामारीचा फायदा उचण्याचा प्रयत्न करत आहेत. हे गुन्हेगार मोबाईल फोनद्वारे मालवेअर, स्पायवेअर आणि रॅनसमवेअर पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत. फोनमधील सर्व खाजगी डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी, त्याचा चुकीचा वापर होऊ नये यासाठी फोन आणि सर्व अ‍ॅप सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे.

Leave a Comment