ओरिसा समुद्रकिनारी यंदा विक्रमी संख्येने आली ओलिव रिडले कासवे


फोटो साभार द. ट्रिब्युन
कोविड १९ नियंत्रणासाठी लॉक डाऊन मध्ये ३० एप्रिल पर्यंत वाढ करणारे ओरिसा देशातील पहिले राज्य बनले असतानाच दुसरी एक आनंदाची बातमी आली आहे. यंदा ओरिसाच्या समुद्र किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी ८ लाखाहून अधिक ओलिव रिडले कासवे अली आहेत. लॉक डाऊन मुळे प्रदूषणात घट झाली आहे तसेच समुद्र किनाऱ्यावर मच्छिमार, पर्यटक यांची वर्दळ रोडावली आहे. परिणामी समुद्र स्वच्छ झाला असून कासवे येथे मोठ्या प्रमाणावर अंडी घालत आहेत.

गेली काही वर्षे मानवी हस्तक्षेप आणि प्रवासातील अन्य काही अडचणी यामुळे रिडेल कासवे किनाऱ्यावर येऊन अंडी घालण्याचे प्रमाण काळजी वाटावी इतके घटले होते. काही वर्षापूर्वी या अंड्यांना संरक्षण देऊन कासवांची पिले अंड्यातून बाहेर पडली की त्यांना पुन्हा समुद्रात सोडण्याचे काम स्वयंसेवी संस्था करत होत्या. यंदा मात्र विक्रमी संखेने कासवी अंडी घालत असून वाळूत त्यासाठी कासवे घरे करतात. एका घरात सरासरी १०० अंडी घातली जातात. रुशिकुल्या किनाऱ्यावर मोठ्या संखेने कासवे येत असून अंडी घालत आहेत. साधारण ४५ दिवसानंतर त्यातून पिले बाहेर येतात आणि समुद्रात परत जातात. कासवी अंडी घालण्यासाठी पूर्वी ज्या जागी गेल्या असतील तेथेच परत जातात असे प्राणीतज्ञ सांगतात.

Leave a Comment