सौदी शाही परिवारात १५० जणांना कोविड १९ची लागण


फोटो साभार जागरण
सौदी शाही परिवारातील सुमारे १५० जणांना कोविड १९ चा संसर्ग झाल्याचे त्यांच्या निकटवर्ती मित्रांकडून सांगण्यात आले असून सौदी शाह सलमान यांनी सुरक्षेसाठी लाल सागरावर जेद्दा शहरात बांधलेल्या द्वीप महालात आयसोलेशन मध्ये राहण्यासाठी स्थलांतर केले आहे. तर क्राऊन प्रिन्स मुहम्मद बिन सलमान यांनी त्यांच्या काही मंत्र्यांसह समुद्र तटावर जेथे नेओम नावाचे भविष्यातील शहर वसविले जात आहे तेथे मुक्काम हलविला आहे.

सुमारे सहा आठवड्यापूर्वी सौदी मध्ये पहिला करोना संशयित सापडला होता आणि त्यानंतर करोनाची दहशत फैलावत गेली आहे. सौदीने सर्व प्रकारच्या प्रवासांवर निर्बंध घातले असून मक्का, मदिना सारखी पवित्र स्थळे बंद केली आहेत. सर्व मोठ्या शहरात लॉक डाऊन असून हज यात्रा रद्द करण्याचा विचार सुरु असल्याचेही समजते. १७९८ पासून ही यात्रा अखंड भरते आहे. नेपोलियन ने इराण वर हल्ला केला तेव्हापासून ही यात्रा भरते आहे. सौदीत आत्तापर्यंत २७९५ जणांना करोनाची लागण झाली असून मृतांचा आकडा ४१ आहे.

Leave a Comment