वन प्लस ८ सिरीज १४ एप्रिलला लाँच


फोटो साभार इनएग्झीक्यूटीव्ह
चीनी स्मार्टफोन कंपनी वन प्लस त्यांची वन प्लस ८ सिरीज १४ एप्रिल रोजी लाँच करत आहे मात्र त्यापूर्वीच वन प्लस ८ आणि ८ प्रोची स्पेसिफिकेशन लिक झाली आहेत. त्यानुसार या फोन पैकी एक वार्प चार्ज ३० वायरलेस सपोर्ट करेल. हा चार्जर फोनला १ ते ५० टक्के ३० मिनिटात चार्ज करेल. त्यात एक पंप दिला गेला असून त्यामुळे काही चुकीचे चार्जिग होत असेल तर स्वीच आपोआप बंद होईल. फास्ट आणि स्टेबल चार्जिग हा युजरसाठी एक वेगळा अनुभव ठरेल असा दावा केला जात आहे.

दरम्यान वनप्लस चे सीईओ लाऊ यांनी ट्विटरवर चार फोटो शेअर केले असून ते वन प्लस ८ प्रो मधून काढल्याचे संकेत दिले आहेत. फोनला क्वाड कॅमेरा सेटअप दिला जाईल आणि त्यातील कॅमेरे ४८, ४८,१६, ५ एमपीचे असतील तर सेल्फी साठी १६ एमपी चा कॅमेरा असेल. दोन व्हेरीयंट मध्ये हा फोन येईल. पैकी ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजची किंमत ७६ हजारदरम्यान असेल तर १२ जीबी रॅम २५६ जीबी स्टोरेज ८४ हजार दरम्यान असेल.

फोनला ६.५ इंची स्क्रीन, अँड्राईड १० ओएस असेल आणि हे फोन ५ जीला सपोर्ट करतील असेही समजते.

Leave a Comment