दुय्यम दर्जाचा माल पुरवून चीनचा फिनलंडला करोडोंचा चुना


फोटो साभार जागरण
फिनलंडने चीन कडून मागविलेल्या २० लाख सर्जिकल मास्क आणि २.३० लाख रेस्पिरेटर मास्क मध्ये चीनने दुय्यम दर्जाचा माल पुरवून फिनलंडला कोट्यावधींचा चुना लावल्याचे फिनलंड आरोग्य विभागाच्या प्रवक्त्या किरसी वर्हीला यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. मागविलेला माल अगदीच कमी दर्जाचा आहे आणि त्यामुळे डॉक्टर, नर्स व अन्य आरोग्य कर्मचारी ते वापरू शकत नसल्याचे त्या म्हणाल्या.

चीनच्या वैयक्तिक सुरक्षा उपकरणांना सध्या कोविड १९ मुळे जगभरातील देशांकडून मोठी मागणी असताना चीन मात्र दुय्यम दर्जाचा माल पुरवून करोडो रुपयांची कमाई करत असल्याचे आरोप होत आहेत. यापूर्वी स्पेन, नेदरलंड, तुर्कस्तान, नेपाळ आणि ऑस्ट्रेलियाने हीच तक्रार केली आहे. त्यात आता फिनलंडची भर पडली आहे.

फिनलंडच्या आरोग्य मंत्री एनो का इसा पेकोनन यांच्या म्हणण्यानुसार एन ९५ मास्क डॉक्टर्स आणि नर्स यांच्या वापरासाठी आवश्यक आहेत. ऑर्डर देताना पूर्ण रक्कम अगोदर भरावी लागते. त्याप्रमाणे आम्ही ऑर्डर दिली आणि पहिली शिपमेंट मिळाली पण प्रत्यक्षात त्यातील ऑर्डर केलेला माल दुय्यम दर्जाचा असल्याचे दिसून आले. त्यामुळे आम्ही निराश झालो आहोत. अर्थात हे दुय्यम दर्जाचे मास्क आम्ही रहिवासी भागात काम करत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना वापरण्यासाठी देणार आहोत आणि स्वदेशी कंपनीलाच आता आम्ही एन ९५ मास्क बनविण्याच्स सांगितले आहे. मात्र चीनने अशी फसवणूक केल्याने आमचा विश्वास उडाला आहे.

चीनने मात्र युरोपीय देशात दुय्यम दर्जाचा माल पाठविल्याचा आरोप फेटाळून लावताना अमेरिकेच्या इशाऱ्यावर हे देश खोटे आरोप करत असल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment