आता पीपीएफ, आरडी खात्यात किमान रक्कम न भरल्यास भरावा लागणार नाही दंड

कोरोना व्हायरसमुळे जगभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशा स्थितीत परिस्थिती फारच बिकट झाली आहे. लोक घरातच थांबून हा व्हायरस रोखण्यासाठी आपले योगदान देत आहेत. मात्र या लॉकडाऊनमध्ये काही अत्यावश्यक गोष्टी सतत उपलब्ध आहेत. त्यामुळे नागरिकांना कोणतीही समस्या निर्माण होत आहे. अशाच 5 गोष्टींविषयी जाणून घेऊया.

लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा सोडून सर्व बंद आहेत. अशा परिस्थितीत लोकांना कर्जाच्या हप्त्यापासून ते खात्यात रक्कम भरणे देखील शक्य नाही. त्यामुळे आर्थिक वर्ष 2019-20 साठी विविध लघू बचत योजनांमध्ये किमान रक्कम जमा केली नाहीतरी टपाल विभागाकडून दंड/रिवाइव्हल शुल्क माफ केले जाणार आहे. सार्वजनिक भविष्य निधी (पीपीएफ) आणि रेकरिंग डिपॉजिट (आरडी) इत्यादी योजनांवर 30 जूनपर्यंत दंड माफ आहे.

विभागाने जारी केलेल्या सर्क्युलरनुसार, 30 जूनपर्यंत पीपीएफ आणि आरडीवरील किमान रक्कम न भरल्यास कोणताही दंड आकारला जाणार नाही.

लॉकडाऊनमुळे अनेक गुंतवणूकदार वेळेवर आपल्या खात्यात पैसे जमा करू शकत नाही. त्यामुळे अर्थ मंत्रालयाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. जर तुम्ही खात्यात आर्थिक वर्ष 2019-20 साठी किमान रक्कम भरली नसल्यास कोणताही दंड आकारला जाणार नाही. मात्र मे महिन्याची रक्कम वेळेवर न भरल्यास दंड वसूल केला जाईल.

जर तुम्ही पीपीएफ खात्यात एका आर्थिक वर्षात किमान 500 रुपये गुंतवणूक न केल्यास तुमचे खाते निष्क्रिय होईल. हे खाते तुम्ही पुन्हा 50 रुपये आणि किमान रक्कम 500 रुपये भरून पुन्हा चालू करू शकता.

Leave a Comment