जिओच्या नव्या अॅपच्या माध्यमातून घरबसल्या कमवा पैसे

जिओने एक नवीन अ‍ॅप जीओपीओएस (JioPOS) लाईट कम्युनिटी रिचार्ज अ‍ॅप लाँच केले आहे. हे अ‍ॅप कोणत्याही व्यक्तीला जिओ पार्टनर बनणे, अन्य ग्राहकांना प्रीपेड रिचार्ज करणे आणि पैसे कमविण्यास मदत करते.

या अ‍ॅपद्वारे जिओ पार्टनर झाल्यानंतर युजर अन्य ग्राहकांच्या खात्यात रिचार्ज करू शकतात आणि कमिशन कमवू शकतात. याची खास गोष्ट म्हणजे यासाठी कोणत्याही हार्डकॉपी अथवा फिजिकल व्हेरिफिकेशनची गरज नाही.

जिओपीओएस लाईट अ‍ॅप अन्य युजर्सचे रिचार्ज करण्यासाठी 4.16 टक्के कमिशन देते. यात एक पासबुक फीचर आहे, ज्याद्वारे युजर मागील 20 दिवसांचे व्यवहार पाहू शकतात.

हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर रजिस्ट्रेशन प्रोसेस पुर्ण करावी लागेल. यूजर येथे 500 रुपयांपासून ते 2 हजार रुपये भरू शकतात. या पैशांद्वारे अन्य युजर्सचे रिचार्ज करू शकता. या अ‍ॅपद्वारे 100 रुपये खर्च केल्यानंतर 4.166 रुपये कमिशन मिळेल.

हे अ‍ॅप युजर्ससाठी लोकप्रिय रिचार्ज प्लॅन देखील दाखवते. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध असून, आयओएस व्हर्जन सध्या उपलब्ध नाही.

Leave a Comment