लॉकडाऊनचे उल्लंघन करणे या क्रिकेटपटूला पडले महागात

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी काही ठिकाणी लॉकडाऊन, तर काही ठिकाणी कर्फ्यू आहे. अशा स्थितीमध्ये हिमाचल प्रदेशचा क्रिकेटपटू ऋषि धवनला कारमधून बाजारात जाणे चांगलेच महागात पडले आहे. यासाठी पोलिसांनी त्याचे 500 रुपयांचे चलान कापले आहे.

नियमानुसार बाहेर पडल्यास वाहन पासची गरज असते, मात्र हा पास धवनकडे नव्हता.

रिपोर्ट्सनुसार, धवन जात असताना पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली. मात्र त्याच्याकडे वाहनाची परवानगी नव्हती. जिल्हा प्रशासनाने कर्फ्यूमध्ये थोडी ढील दिली होती. मात्र तेव्हाही वाहनांना परवानगी दिलेली नाही. केवळ गरजेच्या वाहनांनाच येण्या-जाण्याची परवानगी आहे.

नियमांचे उल्लंघन केले असल्याने धवनचे 500 रुपयांचे चलान कापण्यात आले. त्याने तो दंड देखील त्वरित भरला. दरम्यान, ऋषि धवनने कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 1 लाख रुपयांची मदत दिली आहे.

Leave a Comment