‘मसक्कली 2.0’ च्या रिमेकवर एआर रेहमान यांनी व्यक्त केली नाराजी

नुकतेचे रिलीज झालेले ‘मसक्कली 2.0; हे गाणे सध्या चर्चेत आहे. यात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री तारा सुतारिया यांची जोडी पाहण्यास मिळत आहे. चाहत्यांसोबतच मुळ गाण्याच्या निर्मात्यांना देखील हे आवडलेले नाही. हे गाणे राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘दिल्ली-6’ चित्रपटातील मसक्कली गाण्याचे रिमेक आहे. मूळ गाण्याला संगीतकार एआर रेहमान यांनी म्यूझिक दिले होते, तर गीत प्रसून जोशी यांनी लिहिले आहे.

मसक्कली 2.0 गाणे रिलीज झाल्यानंतर एआर रेहमान यांनी देखील सोशल मीडियाद्वारे नाराजी व्यक्त केली. त्यांनी लिहिले की, कोणतेही शॉर्ट कट्स वापरले नाहीत, असंख्य रात्री न झोपता, वारंवार लिहिले. 200 पेक्षा अधिक संगीतकार, 365 दिवसांच्या क्रिएटिव्ह ब्रेनस्टोरमिंगचा उद्देश हा होता की असे संगीत निर्माण करणे, जे अनेक पिढ्या चालेल.

आपल्या या ट्विटमध्ये रेहमान यांनी दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा आणि गीतकार प्रसून जोशी यांना देखील टॅग केले. त्यांनी देखील रेहमान यांच्या म्हणण्याला पाठिंबा दर्शवला.

मेहरा यांनी ट्विट केले की, प्रेम आणि उत्कटतेने हे गाणे तयार केले आहे. रिमिक्स तुमचे कान खराब करतील, सावध रहा.

प्रसून जोशी यांनी ट्विट केले की, दिल्ली-6 साठी लिहिलेली मसक्कलीसह सर्वच गाणी ह्रदयाच्या जवळची आहेत. अशाप्रकारे मुळ गाण्याचा वापर केलेला पाहून दुःख होते. आशा आहे की चाहते नक्कीच मुळ गाण्याच्या बाजूने उभे राहतील.

गायक मोहीत चौहान, अभिनेत्री सोनम कपूर, गायिका श्रेया घोषाल आणि दिग्दर्शक हंसल मेहता यांनी देखील यावर नाराजी व्यक्त केली.

Leave a Comment