रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टचा लोगो सादर


फोटो साभार इनएग्झेक्युटीव्ह
अयोध्येत राममंदिर उभारणी साठी स्थापन करण्यात आलेल्या रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टने ट्रस्टचा अधिकृत लोगो हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर अत्यंत साधेपणे सादर करण्यात आलेल्या कार्यक्रमात सादर केला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते हा लोगो प्रदर्शित करण्यात आला असे समजते.

चैत्री नवरात्राच्या पहिल्या दिवशी तीरपाल मध्ये स्थापित असलेली रामललाची मूर्ती मंदिर जेथे बांधले जाणार आहे तेथे जवळच तात्पुरत्या स्वरुपात बांधल्या गेलेल्या जागी योगी आदित्यनाथ यांच्याच हस्ते स्थापन केली गेली होती. हनुमान जयंती दिवशी आणखी एक साधा कार्यक्रम करून त्यात ट्रस्टचा लोगो प्रदर्शित केला गेला. यावेळी मिडियालाही आमंत्रण केले गेले नाही. कोविड १९ मुळे अयोध्येतही लॉकडाऊन असल्याने अगदी मोजके लोक यावेळी उपस्थित होते असे समजते.

या लोगोमध्ये सूर्य प्रतिमा दिसत असून त्याच्या मध्ये भगवान राम प्रतिमा आहे. लोगो मध्ये केशरी, पिवळा आणि लाल रंगाचा सर्वाधिक वापर केला गेला आहे.

Leave a Comment