जपान आणीबाणी- ऑलिम्पिक मशाल प्रदर्शन बंद


फोटो साभार रॉयटर
जपान मध्येही करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने पंतप्रधान शिंजो आबे यांनी आणीबाणी जाहीर केली आहे. त्यामुळे देशाच्या फुकुशिमा शहरात सुरु असलेले ऑलिम्पिक मशाल प्रदर्शन बंद केले गेले आहे. टोक्यो ऑलिम्पिक आयोजकांनी या संदर्भात माहिती दिली. ते म्हणाले जपानच्या सहा शहरात आणीबाणी लागू झाली आहे. १ महिना हा आदेश लागू राहणार आहे.

ही ऑलिम्पिक ज्योत २० मार्च रोजी ग्रीस येथून खास चार्टर्ड विमानाने जपानला आणली गेली तेव्हा ती पाहण्यासाठी रेल्वेस्टेशन वर ५० हजार हून अधिक नागरिक जमले होते. २५ मार्च पासून टॉर्च रिले सुरु होणार होती पण स्पर्धा स्थगित झाल्याने मशाल ऑलिम्पिक व्हिलेज मध्ये दर्शनासाठी ठेवली गेली होती. आता येथे जाऊन नागरिक मशाल पाहू शकणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Comment