मेडिकल ज्युवेलरी कंपनीने बनविले करोना पेंडंट


फोटो साभार दै. भास्कर
रशियन मेडिकल ज्युवलरी कंपनी डॉ. वोरोबेव ने करोना विषाणूच्या आकाराचे एक पेंडंट नुकतेच लाँच केले असून त्याची ऑनलाईन विक्री सुरु केली आहे. हे पेंडंट खरेदीसाठी ग्राहकांनी एकच गर्दी केली असून या पेंडंटची किंमत आहे १ हजार रुपये. सोशल मीडियावर अनेकांनी, कंपनीने महामारी कॅश करत असल्याची जोरदार टीका केली आहे. मात्र कंपनीचे संस्थापक त्याच्याशी सहमत नाहीत. त्यांच्या मते कोविड १९ मुळे निर्माण झालेल्या भयंकर परिस्थितीतही आरोग्य कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत त्यांना सपोर्ट देण्यासाठी आणि करोनाचा निप्पात होणार ही आशा जागी करण्यासाठी मुद्दाम हे पेंडंड तयार केले गेले आहे.

कंपनीचे संस्थापक पोवेल वोरोबेव म्हणाले हे पेंडंड लाँच करण्यामागे पैसे मिळविणे हा उद्देश नाही तर डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी यांचे कौतुक करणे आणि कोविड १९ वरील विजयाचे प्रतिक अशी भावना आहे. करोना मधून बरे झालेले सर्व थरातील अनेक लोक आणि डॉक्टर्स सुद्धा हे पेंडंट मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहेत. अनेक खरेदीदार हे पेंडंट डॉक्टर्सना गिफ्ट करत आहेत. कोविड १९ विषाणूचा पहिला फोटो प्रसिध्द झाला तेव्हाच कंपनीने हे पेंडंट बनविण्याची तयारी केली होती.

मेडिकल ज्युवेलरी कंपनी डॉ. वोरोबेव अनेक वर्षे या उद्योगात असून तिथे डीएनए, हृद्य, व शरीराच्या विविध अवयवाच्या आकाराचे दागिने बनवून ते विकले जातात. करोना पेंडंट नंतर कंपनी आता करोना ब्रोच बनविणार आहे. त्यात पिंजऱ्यात करोनाचा विषाणू असेल.

Leave a Comment