फोटो गॅलरी : लॉकडाऊनमध्ये जगभरात दिसला ‘गुलाबी सुपरमून’

जगभरात सध्या कोरोन व्हायरसमुळे लॉकडाऊन आहे. अशा स्थितीत वर्षाचे सर्वात मोठा आणि  चमकदार चंद्र म्हणजेच सुपरमून 7 एप्रिलला रात्री 11.30 वाजता जगभरातील लोकांना पाहण्यास मिळाला. अनेक देशांनी वेगवेगळ्या वेळी हा सुपरमून पाहिला. या चंद्राला सूपर पिंक मून देखील म्हटले जात आहे. जगभरात काढण्यात आलेल्या या सुपरमूनचे आकर्षक फोटो पाहूयात.

Image Credited – Aajtak

नवी दिल्लीतील इंडिया गेट येथून सुपरमूनची एक झलक पाहायला मिळाली. मात्र हे सुंदर दृश्य पाहण्यासाठी नेहमीप्रमाणे लोकांची गर्दी नव्हती.

Image Credited – Aajtak

राजधानी दिल्लीतून देखील या सुपरमूनचे दृश्य टिपण्यात आले.

Image Credited – Aajtak

सुपरमूनचे हे दृश्य गुरुग्राममधील एका मंदिराच्या शिखरावरून कॅमेर्‍यावर कैद करण्यात आले.

Image Credited – Aajtak

चमकदार चंद्राचे हे दृश्य पंजाबच्या लुधियाना येथील आहे.

Image Credited – Aajtak

दुबई येथील जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफाच्या अगदी समोरून हा फोटो काढण्यात आला. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Image Credited – Aajtak

जर्मनीतील ब्रँडनबर्ग गेटच्या मागून घेतलेले सुपरमूनचे हे चित्र खूपच सुंदर आहे.

Image Credited – Aajtak

सुपरमूनला नासाने देखील आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. याशिवाय नासाने याचे लाईव्ह प्रक्षेपण देखील केले.

Image Credited – Aajtak

जर तुम्ही यंदा सुपरमून पाहिला नसेल, तर निराश होण्याची काहीही गरज नाही. कारण खगोलशास्त्रज्ञांच्या मते 7 मे ला तुम्ही पुन्हा एकदा सुपरमून पाहू शकता.

Image Credited – Aajtak

केव्हा दिसतो सुपरमून ?

चंद्र आणि पृथ्वीमधील अंतर जेव्हा सर्वात न्यूनतम पातळीवर असते, तेव्हा त्याला सुपरमून म्हणतात. पृथ्वी ते चंद्राचे सामान्य अंतर 384400 किलोमीटर आहे. तर दोघांमधील अधिकांश अंतर 405696 किमी असू शकते. सुपरमूनच्या वेळी हे अंतर कमी होऊन 356900 किमी राहते.

Leave a Comment