जिवंतपणी पाकने चालवली ब्रिटन पंतप्रधानांच्या मृत्यूची खोटी बातमी

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसची लागण ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना झाल्याची माहिती काही दिवसांपुर्वी समोर आले होते. आतापर्यंत त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. मात्र सोमवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. ब्रिटन आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनुसार, ते आता धोक्यातून बाहेर आलेले आहेत.

मात्र पाकिस्तानच्या प्रमुख न्यूज चॅनेलपैकी एक असलेल्या डॉनने बोरिस जॉन्सन यांच्या मृत्यूची खोटी माहिती प्रसारित केल्याने एकच खळबळ उडाली. चॅनेलच्या या हरकतीनंतर आता त्यांच्यावर टीका केली जात आहे.

एवढेच नाहीतर चॅनेल यासाठी बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या बनावट ट्विट हँडलचा देखील संदर्भ दिला व बोरिस जॉन्सन यांच्या मृत्यूची खोटी बातमी चालवली.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, युजर्स चॅनेलला ट्रोल करत आहेत.

दरम्यान, पंतप्रधान बोरिस यांची प्रकृती आता स्थिर झाली असून, ते चांगले आहे. त्यांना स्टँडर्ड ऑक्सिजन ट्रिटमेंट देण्यात येत असून, त्यांना श्वास घेण्यासाठी कोणत्याही मदतीची गरज नसल्याचे, प्रवक्त्यांनी सांगितले आहे.

Leave a Comment