लॉकडाऊन : घरपोच सामान पोहचवण्यासाठी उबर-फ्लिपकार्टची हातमिळवणी

लॉकडाऊनच्या काळात लोकांना घरपोच सामान पोहचवण्यासाठी उबर आणि ई-कॉमर्स साईट फ्लिपराक्टसोबत भागीदारी केली आहे. याआधी उबरने बिग बास्केट आणि स्पेंसरसोबत हात मिळवला होता.

कंपनीचे म्हणणे आहे की, या कठीण परिस्थितीत लोकांपर्यंत खाण्या-पिण्याच्या गोष्टींसोबतच गरजेचे सामान पोहचवायचे आहे. जेणेकरून त्यांना अडचणीचा सामना करावा लागणार नाही. सोबतच सरकारच्या मार्गदर्शक सुचनांचेही पालन करत आहोत.

उबरने आपल्या अधिकृत ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कंपनीची ही भागीदारी बिझनेस-टू बिझनेस असेल. दिल्ली, मुंबई आणि बंगळुरूला उबर आणि फ्लिपकार्टची सेवा मिळेल.

उबर इंडियाने स्पष्ट केले की, लोकांपर्यंत सामान पोहचवण्यासाठी कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. डिलिव्हरी दरम्यान जेवढे पैसे येतील तेवढे त्या ड्रायव्हर्सलाच दिले जातील.

उबर इंडिया आणि दक्षिण आशियाचे डायरेक्टर प्रभजीत सिंह म्हणाले की, यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यास मदत मिळेल. लोकांनी आपल्या घरातच राहावे, जेणेकरून या महामारीच्या चेनला तोडता येईल.

Leave a Comment