लॉकडाऊनमध्ये लग्न करणाऱ्या वर-वधूसह वऱ्हाडीही अटकेत

सध्या कोरोना व्हायरसमुळे जगभरात लॉकडाऊन आहे. अशा स्थितीत लोकांनी गर्दी करणे टाळावे यासाठी कोणतेही कार्यक्रम करण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. या काळात लोकांना बोलवून लग्न करण्यास देखील मनाई आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेतील एका जोडप्याला लॉकडाऊनमध्ये लग्न करणे चांगलेच महागात पडले आहे.

लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करत लग्नाच्या पार्टीचे आयोजन केल्याने वर-वधूसह लग्नाला आलेल्या पाहुण्यांना देखील दक्षिण आफ्रिकेत अटक करण्यात आले आहे.

48 वर्षीय वर जबुलानी झुलू आणि वधू नामतांडोजो मखिझे यांचे रविवारी लग्न पार पडले मात्र या लग्नात पोलिसांमुळे अडथळा आला. पोलिसांच्या गाडीत बसतानाचे या जोडप्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दक्षिण आफ्रिकेमध्ये सध्या लॉकडाऊनचा दुसरा आठवडा सुरू आहे. क्वाझुलू-नटाल या भागात सार्वजनिक गर्दी करण्यास बंदी असतानाही लग्न पार पडत असल्याचे माहिती पोलिसांना मिळाली. या ठिकाणी पोलिसांनी दाखल होते या जोडप्यासह 50 पाहुण्यांना अटक केले. त्यानंतर या सर्वांना जामीनावर सोडण्यात आले.

पोलिसांनुसार, प्रत्येकाची चौकशी करण्यात येणार असून, त्यानुसार कारवाई केली जाईल. याशिवाय त्यांच्यावर न्यायालयाकडून कारवाई करण्यात येणार आहे.

Leave a Comment