वर्क फ्रॉम होम करताना व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर करू नका या चुका

लॉकडाऊनमुळे कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत आहेत. घरून काम करताना अनेकजन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसे की, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅपचा देखील वापर केला करतात. मात्र या अ‍ॅप्सचा वापर करताना चुका टाळणे गरजेचे आहे, अन्यथा मोठी समस्या निर्माण होऊ शकते.

Image Credited – Navbharattimes

वर्कस्टेशनची फोटो शेअर करू नये –

जर तुम्ही सोशल मीडियावर घरून काम करतानाचा फोटो टाकला, तर अनेकवेळा चुकीने गोपनीय माहिती देखील शेअर होते. असे करणे कंपनीच्या पॉलिसीविरुद्ध असते.

Image Credited – Navbharattimes

ऑफिसची माहिती शेअर करू नये –

ऑफिससंबंधी कोणतीही माहिती सोशल मीडियावर शेअर करू नये. ही माहिती केवळ तुमच्या सहकर्मचाऱ्यांपर्यंतच मर्यादित ठेवा. आपल्या बॉसबद्दल सोशल मीडियावर काहीही लिहू नये.

Image Credited – Navbharattimes

माहिती शेअर करताना घ्या काळजी –

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर कोणतीही फेक न्यूज शेअर केल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता. पोलीस कारवाई देखील होऊ शकते.

Image Credited – Navbharattimes

ई-मेल शेअर करू नये –

सोशल मीडियावर कंपनीची पॉलिसी, एचआरचा मेल व अन्य गोपनीय माहिती शेअर करू नये.

Image Credited – Navbharattimes

कोव्हिड-19 संबंधी व्हिडीओ –

कोव्हिड-19 संबंधी ज्या व्हिडीओची पुष्टी झालेली नाही, असे हिंसेचे व्हिडीओ शेअर करू नये. एक चुकीचा व्हिडीओ मोठी समस्या निर्माण करू शकतो.

Leave a Comment