धक्कादायक : 40 कोटी भारतीय दारिद्र्य रेषे खाली जाण्याची शक्यता – यूएन

कोरोना व्हायरसमुळे एकीकडे हजारो जणांचे प्राण गेले आहेत, तर दुसरीकडे अर्थव्यवस्थेवर देखील याचा परिणाम पाहण्यास मिळत आहे. द्वितीय विश्वयुद्धानंतर सर्वात मोठे आर्थिक संकट आहे. या संकटामुळे अनौपचारिक क्षेत्रात काम करणारे तब्बल 40 कोटी भारतीय कर्मचारी दारिद्र्य रेषेच्या खाली जाण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्राचीच एक संस्था असलेले जागतिक कामगार संघटनेच्या (आयएलओ) रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

जागतिक स्तरावर वर्ष 2020 च्या दुसऱ्या तिमाहीत पुर्णवेळ काम करणाऱ्या तब्बल 19.5 कोटी लोकांची नोकरी देखील जाऊ शकते. आयएलओच्या रिपोर्टमध्ये कोव्हिड-19 मुळे जगावर कसा परिणाम होईल याची संपुर्ण माहिती देण्यात आली आहे.

रिपोर्टनुसार, यामुळे आताच अनौपचारिक क्षेत्रातील कोट्यावधी कर्मचाऱ्यांवर परिणाम पाहण्यास मिळत असून, भविष्यात यामुळे 2 बिलियन लोकांना धोका निर्माण होणार आहे. याचे परिणाम विकसनशील देशात सर्वाधिक पाहण्यास मिळतील.

रिपोर्टनुसार, भारतातील जवळपास 90 टक्के लोक अनौपचारिक क्षेत्रात काम करतात. यामुळे 40 कोटी लोक दारिद्र्य रेषेच्या खाली जाऊ शकतात. लॉकडाऊनमुळे त्यांच्या आर्थिक स्थितीवर मोठा परिणाम झाला असून, अनेक लोक ग्रामीण भागात परतले आहेत.

आयएलओचे डायरेक्टर जनरल गय रायडर यांच्यानुसार, उद्योग आणि कर्मचारी मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. आपल्या सर्वांना एकत्र येऊन लवकरात लवकर निर्णय पावले उचलायला हवी. योग्य, त्वरित उपाययोजना परिणामकारक ठरू शकतात. मागील 75 वर्षातील आंतरराष्ट्रीय सहकार्याची ही सर्वात मोठी परिक्षा आहे.

यामुळे अरब देशात 8.1 टक्के (5 मिलियन), यूरोपमध्ये 7.8 टक्के (12 मिलियन), आशिया-प्रशांत भागात 7.2 टक्के (125 मिलियन) पुर्णवेळ कर्मचाऱ्यांची कपात होऊ शकते. याचा सर्वाधिक फटका, एकॉमोडिशन, धान्य सेवा, उत्पादन, रिटेल, व्यवसाय आणि प्रशासकीय सेवांना बसणार आहे.

Leave a Comment