या मंदिरात दाढी मिशासह विराजमान आहेत हनुमान


फोटो साभार पत्रिका
आज देशभरात हनुमान जयंती साजरी होत आहे. रामाच्या या दूताचा म्हणजे बजरंगबलीचा हा जन्मदिवस. देशात एकही गाव असे नाही जेथे हनुमानाचे देऊळ नाही. हनुमान संकटमोचन देवता आहे असे मानले गेले आहे त्यामुळे भाविक कोणत्याही अडचणींचा सामना करताना हनुमानाची भक्ती करतात. त्याचा आशीर्वाद सर्व संकटे हरण करणारा असतो असा गाढ विश्वास भाविकांच्या मनात आहे.

राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात सालासर येथे देशातील एकमेव असे हनुमान मंदिर आहे जेथे दाढीमिशासह हनुमान विराजमान आहेत. या हनुमानला सालासार बालाजी असे नाव आहे. यामागची कथा अशी सांगतात, मोहनदास नावाचे ठाकूर होते ते बालाजी भक्त होते. ते बालाजीला सतत मूर्तीरुपाने प्रकट व्हा अशी प्रार्थना करत असत. त्याचवेळी नागोर जिल्ह्यात असोटा गावात एक शेतकरी शेत नांगरत होता तेव्हा त्याचा नांगराला काही तरी अडकले म्हणून त्याने पहिले तर दगडाची एक मूर्ती त्याला दिसली.

हे साल होते १८११. शेतकऱ्याची पत्नी त्याचवेळी त्याला न्याहारी घेऊन आली होती. तिने हनुमानाची मूर्ती पाहताच तेथेच त्याला बाजरा चुराम्याचा नैवेद्य दाखविला. तेव्हापासून या हनुमानाला बाजरा चुराम्याचा नैवेद्य दाखविण्याची प्रथा सुरु झाली. इकडे मोहनदास याना स्वप्नात बालाजीने दर्शन देऊन असोता येथून मूर्ती आण असा दृष्टांत दिला.

मूर्ती आणताना एक अट होती, ती अशी की ज्या बैलगाडीतून मूर्ती आणायची ती गाडी कुणीही चालवायची नाही. जेथे गाडी थांबेल तेथेच मूर्तीची स्थापना करायची. त्याप्रमाणे सालासार येथे बैलगाडी थांबली म्हणून तेथेच मूर्ती स्थापन करून मंदिर बांधले गेले.

Leave a Comment