तब्बल १० लाख रुपये किलोने विकला जातो हा किडा


फोटो साभार युट्युब
जगात महाग वस्तूंची कुतूहलापोटी नेहमीच चर्चा होत असते. मग त्या कार्स असोत, घरे असोत, नाहीतर भाजी असो. काही वस्तू इतक्या महाग असतात की त्यावर विश्वास ठेवणेही अवघड असते. यार्सागुंबा नावाचा किडा या कॅटेगरी मध्ये मोडतो. या किड्याचा वापर जडीबुटी प्रमाणे केला जातो. भुरकट रंगाचा, साधारण दोन इंच लांबीचा या किड्याची खासियत म्हणजे हा चवीला गोड असतो. जगभरात हा किडा विविध नावाने परिचित आहे.

नेपाळ, चीन मध्ये याला यार्सागुंबा म्हणतात तर भारतात किडा जडी. त्याचे इंग्रजी नाव आहे कॅटरपिलर फंगस. हिमालयात साधारण १५ हजार फुट उंचीवर तो सापडतो आणि त्याला हिमालयन वायग्रा असेही म्हटले जाते. याचा उपयोग सेक्स पॉवर वाढविणे त्याचबरोबर श्वास रोग आणि किडनीच्या आजारात केला जातो. या किड्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते असेही सांगतात. या एका किड्याची किमत १ हजारापर्यंत असते आणि किलोच्या भावाने तो १० लाख रुपये किलो आहे.

हा किडा जन्माला येतो तो डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात. त्यावेळी त्याच्या अंगात एक प्रकारचा रस असतो. या किड्याचा जीवनकालावधी चार ते पाच महिन्याचाच आहे. त्यामुळे हे किडे मे जून मध्ये जंगलात झाडांच्या भोवती मेल्यामुळे विखरून पडलेले दिसतात. ते एकत्र करून वाळविले जातात आणि त्याची पूड औषधात वापरली जाते. हृदयरोग्यांना मात्र हा किडा जीवघेणा ठरू शकतो. भारतात या किड्याचा वापर करण्यावर बंदी आहे.

Leave a Comment